Health Care :  छातीत जळजळ आणि अॅसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॅसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता.  
 
पोटात दुखत असेल किंवा अॅसिडीटी होत असेल तर आवळा खावा किंवा आवळ्याची पावडर पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. आवळ्यामुळे छातीत होणारी जळजळ, पित्त कमी होते. रात्री झोपण्याआधी एक चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून प्यावे. त्यामुळे पचन देखील चांगले होते आणि पित्त देखील होत नाही. 


आवळा पावडर तयार करायची सोपी पद्धत


आवळा पावडर तयार करण्यासाठी आवळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेला आवळा किसून घ्या. त्यानंतर तो ऊन्हामध्ये वाळवा. वाळलेला आवळा मिक्सरमधून बारीक करून घ्या 


आवळ्यामध्ये क जीवनसत्त्वाचे  प्रमाण जास्त असते. त्यामुळे डोळे चांगले राहतात आणि पचन क्रिये संबंधित सर्व आजार दूर होतात.  आवळा पावडरमध्ये एथेनाॅलिक हा घटक असतो. यामुळे वजन कमी होते.  गरम पाण्यात एक ते दोन चमचे आवळा पावडर घालून ते पाणी दिवसातून दोन वेळा प्यायल्यानं पचन क्रिया सुधारते आणि वजन देखील झटपट कमी होते. 


संबंधित बातम्या :



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha