Happy New Year 2024 : सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेकजण नवीन वर्षाच्या (Happy New Year) स्वागतासाठी वेगवेगळ्या डेस्टिनेशनला देखील भेट देतात. तर काही मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबर घरीच नवीन वर्षाचं स्वागत करतात. थोडक्यात, काय तर सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पण, हा आनंद साजरा करण्यामागचा नेमका इतिहास काय आहे? नवीन वर्ष साजरा करण्याची सुरुवात नेमकी कशी झाली? या संदर्भात फारच क्वचित लोकांना माहिती आहे. तर, आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला याच संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत. 

Continues below advertisement


नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली? 


इ.स.पूर्व 45 पूर्वी रोमन साम्राज्यात कॅलेंडर वापरात होते. रोमचा तत्कालीन राजा नुमा पॉम्पिलस याच्या वेळी, रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिने, वर्षात 310 दिवस आणि आठवड्यात 8 दिवस होते. काही काळानंतर, नुमाने कॅलेंडरमध्ये बदल केले आणि जानेवारी हा कॅलेंडरचा पहिला महिना मानला. 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झाल्यानंतर 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला.


...म्हणून 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात  


रोमन शासक ज्युलियस सीझर हा 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करणारा पहिला व्यक्ती होता. नवे कॅलेंडर तयार करण्यासाठी ज्युलियस सीझर यांनी काही खगोलशास्त्रज्ञांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की पृथ्वी 365 दिवस आणि सहा तासांमध्ये सूर्याला एक फेरी मारतो. त्यामुळे जूलियसने 365 दिवसाचे एक वर्ष असणारे कॅलेंडर तयार केले. 


पोप ग्रेगरी यांनी  1582 मध्ये  जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली. त्याकाळचे प्रसिद्ध धर्म गुरू सेंट बीड यांनी सांगितले की, एका वर्षात 365 दिवस, 5 तास आणि 46 सेकंद असतात. त्यानंतर रोमन कॅलेंडरमध्ये काही बदल करण्यात आले. तेव्हापासून नवं वर्ष 1 जानेवारीपासून साजरं केले जाऊ लागलं.


भारतात 'या' दिवसांनाही साजरा केला जातो न्यू ईयर 


भारतात  1 जानेवारी बरोबरच अनेक वेगळा न्यू ईअर साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी नव वर्ष साजरे केले जाते. हवामानानूसार, ऋतूनुसार तसेच लूनार आणि  राष्ट्रीय (सौर) कॅलेंडरनुसार भारतात वेगवेगळ्या दिवसांना नववर्ष लोक साजरे करतात. बैसाखीच्या दिवशी भारतातील उत्तर आणि मध्य भागात नववर्ष साजरे केले जाते. तर लूनार कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात उगादी आणि  महाराष्ट्रात  गुढी पाडवा हे सण साजरे करून नव वर्षाचे स्वागत केले जाते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Healthy New Year : नवीन वर्षात राहा हेल्दी आणि फिट; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स