Hair Care Tips : आपले केस धुताना अनेकजण शॅम्पूबरोबर कंडिशनरचा देखील वापर करतात. याचं कारण म्हणजे केसांना कंडिशनर लावल्याने केस निरोगी (Hair Care Tips) आणि चमकदार ठेवण्यास मदत होते. तर, काही लोक शॅम्पूनंतर कंडिशनर लावत नाहीत, त्यांच्या केसांचा ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे त्यांचे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. पण, आजकाल, रिव्हर्स शॅम्पू देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे या संदर्भात तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
रिव्हर्स शॅम्पू करण्याची पद्धत काय आहे?
रिव्हर्स शॅम्पू ही केस धुण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये लोक सर्वात आधी केसांना कंडिशनर लावतात, नंतर केस धुतात आणि त्यानंतर केसांना शॅम्पू लावतात. साधारणपणे, जेव्हा आपण केस धुवचो तेव्हा सर्वात आधी केसांना शॅम्पू लावतो आणि त्यानंतर केस कंडिशनरने साधारण 5 मिनिटांनी धुवतो. पण, रिव्हर्स शॅम्पू पद्धतीत ही प्रक्रिया उलट होते. यामध्ये लोक सर्वात आधी केसांना कंडिशनर लावतात आणि काही वेळ तसाच ठेवतात. नंतर साध्या पाण्याने केस धुऊन शॅम्पू करतात. यामुळे केस सॉफ्ट होतात असं अनेकांचं म्हणणं आहे. जर तुमचेही केस खूप कोरडे असतील तर एकदा ही पद्धत वापरून पाहा.
कंडिशनर लावल्याने काय फायदा होतो?
1. ओलावा राखण्यास मदत होते
बहुतेक शॅम्पू तयार करण्यासाठी अनेक कॅमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमचे केस लवकर कोरडे होतात. जेव्हा तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर लावता तेव्हा ते तुमच्या केसांमधील ओलावा लॉक करतात आणि केस चमकदार बनवतात.
2. केसांतील गुंता सोडवण्यास मदत होते
काही लोकांच्या केसांत शॅम्पू करताना गुंता तयार होतो. अशा वेळी केसांना कंडिशनर लावल्याने केसांतील गुंता दूर करण्यास मदत होते. कंडिशनर लावल्यानंतर तुम्ही तुमच्या बोटांनी केसांतूल गुंता सोडवू शकता. तसेच, ओल्या केसांना कंघी करण्याची चूक करू नका.
3. केसांची चमक कायम ठेवा
शॅम्पू केल्यानंतर नेहमी कंडिशनर लावल्याने केस दीर्घकाळ निरोगी राहतात. कंडिशनर, एक प्रकारे, आपल्या केसांना प्रथिने पुरवण्याचे काम करतात. ज्यामुळे आपल्या केसांची चमक कायम राहते. याशिवाय शॅम्पू करताना काही चुकांमुळे केस खराब होतात, कंडिशनर लावून तुम्ही केसांना या नुकसानीपासून वाचवू शकता.
4. टाळूसाठी फायदेशीर
केवळ शॅम्पू लावून तुम्हाला कधीही फायदा होणार नाही. यासाठी तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर लावा. खरंतर, शॅम्पूमध्ये असलेल्या रसायनांमुळे, टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ आणि कोंडा होण्याची समस्या असू शकते, तुम्ही कंडिशनर लावून ही समस्या टाळू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :