Hair Care Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार (Food) घेण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का, केसांच्या वाढीसाठी (Hair Care Tips) काही खाद्यपदार्थ देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. केस वाढवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. पण, त्यांचा काही उपयोग होत नाही. केसांच्या वाढीसाठी दररोज काही पदार्थ खाणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्हीही कमी केसांच्या वाढीमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात.
अंडी
केसांच्या वाढीसाठी प्रथिने सर्वात महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत अंडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. तुम्ही अंडी सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता किंवा इतर पदार्थांबरोबर त्याचा आनंद घेऊ शकता.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या तुमच्या कमकुवत केसांना जीवदान देऊ शकतात. यासाठी तुम्ही पालकला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे. खरंतर, शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे देखील केस गळतात, त्यामुळे केस मुळांपासून मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पालक खाऊ शकता.
लिंबूवर्गीय फळे
व्हिटॅमिन-C केस मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. केसांच्या वाढीसाठी आवळा, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस लवकर वाढतात.
गाजर
तुम्हाला केस लवकर वाढवायचे असतील तर तुम्ही गाजराचा रस पिऊ शकता. त्यात व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. तुम्हाला हवं असल्यास सॅलाडमध्ये गाजराचा समावेश करूनही खाऊ शकता.
एवोकॅडो
एवोकॅडो हे व्हिटॅमिन ई चा समृद्ध स्रोत आहे, जे केसांच्या वाढीस मदत करते. तुम्ही ते नाश्त्यात खाऊ शकता. हे सॅलडमध्ये देखील वापरले जाऊ शकते. एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयाच्या आरोग्यालाही प्रोत्साहन देते. त्यामुळे तुम्ही देखील केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर या पदार्थांचा तुमच्या आहारात तुम्ही समावेश करू शकता. यामुळे तुमची केसगळती थांबेल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.