Hair Care Tips : हिवाळ्यात तुमच्या केसांत (Hair Care Tips) कोंड्याची समस्या होणं हे सामान्य आहे. डोक्यातील कोंडा म्हणजे टाळूवर पांढरे फ्लेक्स जे कोरड्या टाळू, बुरशीजन्य संसर्ग किंवा यीस्ट संसर्गामुळे होतात. हिवाळ्यात कोंडा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरडे टाळू. हवेतील ओलावा नसल्यामुळे तुमच्या टाळूची आर्द्रता कमी होऊ लागते. कोंडा झाल्यामुळे डोक्यात खूप खाज येते. खांद्यावरील कोंडा तुमच्यासाठी लाजिरवाणा असू शकतो. हिवाळ्यात येणाऱ्या या समस्येवर घरगुती उपाय नेमके कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


गरम तेल मालिश


हिवाळ्यात तुमची टाळू कोरडी होते आणि त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता असते. ही समस्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल हलके गरम करून केसांना लावा. यामुळे तुमच्या टाळूला आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे कोंडा होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही ते रात्रभर केसांवर सोडू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शैम्पूने केस धुवा.


टी ट्री ऑईल


टी ट्री ऑईलमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ते तुम्हाला कोंडा दूर करण्यात मदत करू शकते. तुम्ही ते तुमच्या तेलात किंवा शॅम्पूमध्ये मिसळून वापरू शकता. यामुळे कोंडा कमी होतो.


कोरफड


कोरफडीमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे कोंडा कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. हे केसांना आर्द्रता देखील देते, ज्यामुळे टाळू कोरडी होत नाही. याबरोबरच केसांना मुलायम ठेवते.


ऍपल सायडर व्हिनेगर


यामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे कोंडा टाळण्यासाठी फायदेशीर आहे. हे केसांना लावा आणि 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने केस धुवा. हे तुमच्या टाळूचा pH योग्य स्तरावर ठेवण्यास देखील मदत करते.


दही आणि लिंबू


कोंडा टाळण्यासाठी दही आणि लिंबू खूप प्रभावी आहेत. लिंबू केसांचा पीएच राखतो, ज्यामुळे कोंडा कमी होतो आणि दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड तुमच्या स्कॅल्पला मॉइश्चरायझ करते. या दोन्ही कारणांमुळे कोंडा कमी होतो. तुम्हीदेखील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हे उपाय नक्की करा. 


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी