Hair Care Tips: दाट, मजबूत आणि निरोगी केस असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, आजकालच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) केस गळण्याची समस्या सर्वांनाच सर्रास जाणवते. लहान वयातच केस गळतीच्या समस्या दिसून येत आहेत. केस गळणे (Hairfall) थांबवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. बाजारात उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे हेयर प्रोडक्ट्स जसे- तेल आणि शॅम्पू वापरले जातात, जरी त्याचा फायदा फारसा होत नाही. आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे केस खराब होऊन खाली पडू लागतात. अनेकदा या चुकांकडे दुर्लक्ष होतं आणि केस गळत (Hairfall) राहतात.


केस गळणे कसे थांबवाल?


सर्वजण केसांची काळजी घेण्यासाठी अनेकदा केसांना शॅम्पू करतात, पण शॅम्पू वापरण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्हालाही तुमचे केस शॅम्पूने योग्य पद्धतीने कसे धुवायचे हे माहित नसेल तर ते आज प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्याकडून जाणून घ्या. केस योग्य पद्धतीने कसे धुवायचे याबद्दल त्यांनी काही माहिती शेअर केली आहे, त्या मदतीने तुम्ही केसांच्या अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. जाणून घेऊया...


केस धुण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?


1. जावेद हबीबने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केसांवर कधीही शॅम्पू लावू नये, असं स्पष्टपणे म्हटलं आहे. शॅम्पूमुळे केसांचं नुकसान होऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. शॅम्पू पाण्यात मिसळूनच केसांना लावावा, यामुळे शॅम्पूमध्ये असलेली रसायनं कमजोर होतात आणि त्यांचा केसांवर नकारात्मक परिणाम होत नाही.


2. केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी प्रथम नेहमी तेल लावलं पाहिजे, असं जावेद हबीब म्हणतात. तेल शॅम्पूच्या काही कठोर रसायनांना (Hard Chemicals) मऊ करते आणि त्यांचा केसांवर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे केसांमध्ये आर्द्रताही टिकून राहते.
 
3. ज्यांचे केस हलके आहेत त्यांनी साध्या तेलाऐवजी व्हिनेगर तेल वापरावे. सफरचंद व्हिनेगर सर्वात फायदेशीर आहे. मात्र, याचा वापर आठवड्यातून एकदाच करावा, असंही जावेद हबीब म्हणतात.


रोज केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं नसून त्यापासून तुमचे केस पातळ होण्याचा धोका अधिक आहे. खरंतर, शॅम्पूमधील सल्फेटसारखे रसायन केसांना कमकुवत बनवते आणि केस तुटण्याची समस्या उद्भवते.


हेही वाचा:


Milk Chapati Health Benefits And Risk : तुम्ही रात्रीच्या जेवणात दूध-चपाती खाता? जाणून घ्या याचे फायदे आणि दुष्परिणाम!