Ginger Murabba Recipe : आरोग्याच्या दृष्टीने आल्याचे (Ginger) अनेक फायदे आहेत. आले पचन सुधारते, सर्दीच्या प्रभावापासून संरक्षण करते, खोकला-सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यांपासून आराम देते. यामुळेच लोक हिवाळ्यात चहामध्ये किंवा जेवणामध्ये आले वापरतात. पण, अनेकांना आल्याची चव आवडत नाही. अशा लोकांना आल्याचे फायदे मिळवून देण्यासाठी तुम्ही आल्याचा मुरांबा (Ginger Murabba) बनवू शकता.
आल्याचा मुरंबा खायला खूप चविष्ट असतो आणि शरीरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांसाठी देखील आल्याचा मुरांबा लाभदायी आहे. तुम्ही देखील हा खास पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आल्याच्या मुरंब्यासाठी साहित्य
आल्याचा मुरांबा अवघ्या अर्ध तासात बनणारा पदार्थ आहे. शिवाय यासाठी जास्त साहित्यही आवश्यक नाही. 1 किलो आल्याचा मुरांबा बनवण्यासाठी आले, 1 किलो साखर, 20 ग्रॅम वेलची पावडर, 10 मिली गुलाबपाणी आणि एक लिंबू आवश्यक आहे.
कसा बनवाल आल्याचा मुरांबा?
* सर्वप्रथम आले धुवून त्याची साल काढा. यानंतर आल्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता गॅसवर एक खोलगट पॅन ठेवा, त्यात एक ग्लास पाणी आणि साखर घाला.
* पाणी आणि साखर व्यवस्थित उकळू द्या आणि त्याचा पाक बनू द्या. आता दुसरे भांडे घ्या आणि त्यात आले उकडून घ्या. यानंतर आल्याचे तुकडे तयार पाकात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.
* नंतर त्यात वेलची पावडर, लिंबू, गुलाब पाणी मिसळून मंद आचेवर शिजवा. नीट शिजल्यावर, थंड करून काचेच्या डब्यात भरून ठेवा आणि हवा तेव्हा त्याचा आस्वाद घ्या.
आल्याच्या मुरांब्याचे फायदे :
आले गरम प्रभावाचा असते, म्हणून खोकला, सर्दी दरम्यान तुम्ही ते खाऊ शकता. याशिवाय गॅस, अपचन, मळमळ आदी समस्यांमध्येही याचे सेवन केल्यास आराम मिळतो. शिवाय आपण सँडविचमध्ये स्प्रेड, जाम म्हणून देखील यांचा वापर करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
- Health Tips : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' भाज्या खा, रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha