Republic Day Parade Guidelines : 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, राजपथावर येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे कोरोना लसीकरण आवश्यक आहे. तसेच, 15 वर्षांखालील मुलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. तसेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर होणाऱ्या कार्यक्रमात लोकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याबाबत मार्गदर्शक सूचना :
- अभ्यागतांसाठी बसण्याची जागा सकाळी सात वाजता उघडली जाईल.
- अभ्यागतांना नियुक्त केलेल्या ठिकाणीच बसावे.
- कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.
- लसीचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे.
- 15 वर्षांखालील मुलांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही.
- पार्किंग मर्यादित आहे, त्यामुळे कार पूल किंवा टॅक्सीने कार्यक्रमाला यावे.
- अभ्यागतांना सुरक्षा तपासणीमध्ये सहकार्य करावे.
- अभ्यागतांनी प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणावे.
- प्रत्येक पार्किंग परिसरात रिमोट कंट्रोल कारच्या लॉक चाव्या ठेवण्याची व्यवस्था केली जाईल.
दिल्लीत 27 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रविवारी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत 27,000 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण पोलीस दलात 71 पोलीस उपायुक्त (DCP), 213 सहायक पोलीस आयुक्त (ACP), 713 पोली निरीक्षक, दिल्ली पोलीस कमांडो, सशस्त्र बटालियन अधिकारी आणि जवान आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 65 कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली पोलीस राष्ट्रीय राजधानीत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- PM Modi : पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद, देशभरातील 29 बालकांचा सन्मान
- Coronavirus Cases Today : सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
- Olympic 2022 : बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी 20 लाख लोकांची कोरोना चाचणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha