Different Spices From Same Plant : मसाल्यांचे (Spices) जग खूप आश्चर्यकारक आणि विस्तृत आहे. या जगात असे अनेक मसाले आहेत, जे दुर्मिळ मसाल्यांच्या श्रेणीत येतात. तसेच हे मसाले बाजारात सहज उपलब्ध नसतात. इथे आपण अशा दोन मसाल्यांबद्दल बोलत आहोत. जे गुणवत्तेत, चव आणि वासामध्ये एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. परंतु ते दोन्हीही एकाच झाडापासून आपल्याला मिळतात. (General Knowledge)
एकाच फळातून मिळणारे दोन मसाले
विशेष म्हणजे हे मसाले फक्त एकाच झाडापासून येत नाहीत, तर झाडाच्या एकाच फळातूनही येतात. जेव्हा तुम्हाला झाडापासून दोन मसाले मिळतात, तेव्हा मनात प्रथम विचार येतो की, दोन मसाले एकाच फळातून कसे काय? पण आपण ज्या मसाल्यांबद्दल बोलत आहोत, त्यांची नावे जायफळ आणि जावित्री अशी आहेत.
बिर्याणीची चव अपूर्णच राहील!
जर तुमचा बिर्याणी पदार्थ आवडीचा असेल तर तुम्हाला हे माहित असेलच की बिर्याणीमध्ये जावित्री टाकल्याशिवाय चव आणि सुंदर सुगंध येणार नाही. जावित्री केवळ चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नव्हे तर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी देखील अन्नामध्ये वापरली जाते. उदाहरणार्थ, ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता, जुलाब, मळमळ या समस्या दूर राहतात.
दुर्गा देवीच्या पूजेत जायफळचा वापर
तर, जायफळ औषधांपासून ते जेवणापर्यंत अनेक प्रकारे वापरली जाते. पण त्याच बरोबर हा मसाला हवन समारंभाचा हा एक महत्वाचा भाग आहे. नवरात्रात दुर्गा मातेच्या पूजेत जायफळ खास अर्पण केले जाते. जायफळाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावणे खूप गुणकारी आहे. विशेषत: ज्यांना मुरुमांची समस्या जास्त आहे. अशा लोकांनी ते त्यांच्या त्वचेवर वापरावे. जायफळमध्ये भरपूर अँटी-डिप्रेशन गुणधर्म असतात, म्हणूनच आयुर्वेदाद्वारे चिंता आणि नैराश्याच्या उपचारात जायफळाचा वापर केला जातो.
'या' देशात जायफळ आणि जावित्रीचे सर्वाधिक उत्पादन
इंडोनेशिया हा संपूर्ण जगात असा देश आहे, जिथे जायफळ आणि जावित्रीचे सर्वाधिक उत्पादन होते. विविध देश येथून विकत घेतात, आणि त्यांचा मसाले म्हणून वापर करतात, तसेत जे देश मोठ्या प्रमाणात औषधे तयार करतात. ते देखील ते विकत घेतात. जायफळाचा उपयोग पोटाच्या आरोग्यासाठी बनवलेल्या औषधांमध्ये केला जातो, जायफळातील रासायनिक संयुगे मानसिक आरोग्य, त्वचेचे आरोग्य आणि अँटी-एर्जिक औषधे बनवण्यासाठी वापरली जातात.
केरळ ही आपल्या देशातील 'मसाल्यांची भूमी'
भारत देशात जायफळ आणि जावित्री सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यात होते. यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. केरळ ही आपल्या देशातील 'मसाल्यांची भूमी' आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक मसाले आपल्याच देशात पिकवले जातात, म्हणूनच आपल्या देशाला जगाची 'मसाल्यांची भूमी' म्हटले जाते, तसेच त्याला 'स्पाईस फॅक्टरी' म्हणतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती Google वर उपलब्ध डेटा, विविध संशोधन साइट्सवरून मिळालेल्या तथ्यांवर आधारित आहे.
इतर बातम्या