Ganesh Chaturthi 2024 : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...' हा जयघोष ऐकू यायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, कारण बाप्पा लवकरच येणार आहे. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होणारा गणेशोत्सव दहा दिवस चालतो आणि या काळात संपूर्ण देशात मोठा जल्लोष पाहायला मिळतो. ठिकठिकाणी बाप्पांचे भव्य मंडपाची तयारी झाली असून भक्त घरोघरीही बाप्पाचे स्वागत करायला सज्ज झाले आहेत. जर तुम्ही तुमच्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल किंवा मंडप सजवत असाल तर त्याच्या मंदिराच्या सजावटीमध्ये रंग आणि त्याच्या निवडीकडे विशेष लक्ष द्या. 'या' चार गोष्टींचा वापर केला पाहिजे.
सजावटीमध्ये रंग आणि बाप्पाच्या आवडीच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
गणेशोत्सव दरम्यान बाप्पाला ज्या ठिकाणी विराजमान केले जाते, त्याठिकाणी सुंदर सजावट केली जाते. लोक मोठ्या उत्साहात बाप्पाच्या मंदिराची सजावट करतात. ज्यामध्ये दिव्यापासून फुलांपर्यंत सर्व गोष्टींचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमच्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल किंवा मंडप सजवत असाल तर त्याच्या मंदिराच्या सजावटीमध्ये रंग आणि बाप्पाच्या आवडीच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. 'या' चार गोष्टींचा वापर केला पाहिजे.
सजावटीत कोणत्या गोष्टींचा वापर करावा?
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरयाचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. बाप्पाला बसवण्यासाठी भक्तांना त्याचा शक्य तितका सुंदर सजवायचा आहे. यावेळी गणेश चतुर्थीचा सण 6 सप्टेंबर रोजी येत आहे, चला तर मग जाणून घेऊया सजावटीत कोणत्या गोष्टींचा वापर करावा.
पिवळे कपडे
गणपती बाप्पाचा मखर किंवा सजावट करताना आसनावर पिवळ्या रंगाचे कापड पसरावे आणि तसेच आजूबाजूची सजावट करतानाही पिवळ्या रंगाचे कापड वापरले तरी उत्तम, कारण पिवळा हा रंग गणपतीचा आवडता रंग मानला जातो.
केळीच्या पानांनी सजवा बाप्पाचा ताट
गणपतीचे मंदिर सजवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करा, यामुळे दरबार सुंदर तर होईलच. शिवाय पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर करणेही खूप शुभ मानले जाते. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना ताटाऐवजी केळीची पाने वापरणे चांगले मानले जाते.
'या' फुलांचा सजावटीसाठी वापर करा
गणेशाच्या दरबाराच्या सजावटीत पारिजात, पिवळा झेंडू आणि जास्वंदीची फुले वापरा. पारिजातची फुले पांढरी आणि केशरी कॉम्बिनेशनची असून ती अतिशय सुंदर दिसतात, तर जास्वंद आणि झेंडूही बाप्पाच्या दरबाराच्या सौंदर्यात भर घालतील. ही सर्व फुले गणपती बाप्पाचीही आवडती मानली जातात.
दुर्वा वापरा
दुर्वा गवत गणपती बाप्पाचा आवडत्या मानल्या जातात. त्यामुळे त्याचा वापर त्यांच्या पूजेतही केला जातो. गणपतीच्या मंदिराच्या सजावटीला फुलांसह हिरवा स्पर्श देण्यासाठी दुर्वा गवताचा वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा>>>
Ganeshotsav 2024 Travel : 'जिथे बाप्पा स्वतः प्रकट झाले, अशी महाराष्ट्रातील 'ही' गणेश मंदिरं माहित आहेत?' गणेशोत्सावात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणं
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )