Ganesh Utsav 2022 Modak Recipe : वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. गणपतीचं आवडता नैवेद्य म्हणजे मोदक.... दररोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. आज आपण पाच प्रकारच्या मोदकाबद्दल जाणून घेणार आहोत...
1) पान मोदक
साहित्य काय?
खायची सहा पाने
तूप - एक मोठा चमचा
बारीक साखर - एक मोठा चमचा
गुलकंद - एक मोठा चमचा
गुलाबची सुखलेली पाने - एक मोठा चमचा
कंडेंस्ड मिल्क-1/4 कप
सूखलेल्या नाराळचा खिस -1/2 कप
फूड रंग -2 थेंब
टूटी-फ्रूटी - 2 चमचे
कृती काय? :
- पान मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी देठ काढून पानाचे लहान तुकडे करा
मिक्सरमध्ये कंडेंस्ड दूध, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या
- पॅन घ्या ...
- पॅन गरम झाल्यानंतर तूप टाका... त्यानंतर लगेच नाराळचा खिस टाकून व्यवस्थित भाजून घ्या
- त्यानंतर पान-साखरेची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा
- या मिश्रणाला दोन मिनिटं व्यवस्थित भाजा
- त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा रंग टाका...
- हे मिश्रण व्यवस्थित मिसळा
- चव वाढवण्यासाठी आणि मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडं खिसलेलं खोबरं, गुलकंट, टुटी फ्रुटी आणि एक चमचा कंडेंस्ड मिल्क टाका...
- या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करा...
- थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
- मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
- तुमचे चविष्ट पान मोदक तयार झाले.
2) खव्याचे मोदक -
साहित्य काय?
खावा (मावा)- 400 ग्रॅम
साखर- 1/4 कप
इलायचीची पावडर -1/4 चमचा
केसर- चिमुटभर
खव्याचे मोदक तयार करण्याची कृती काय?:
खवा मोदक करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या...
पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका
खवा आणि साखर व्यवस्थित मिसळा
खवा आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये केसर टाका
या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा..
त्यानंतर यामध्ये इलायचीची पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या..
थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले.
3) चॉकलेट मोदक
चॉकलेट मोदकासाठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट - 250 ग्राम
खवलेला नारळ - 100 ग्राम
बदाम - 7-8 बदाम
काजू - 5-6 काजू
पिस्ता - 4-5 पिस्ता
कंडेंस्ड दूध - 50 ग्राम
तूप - 1 चमचा
चॉकलेट मोदकाची कृती
- चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी डार्क चॉकलेट तूपामध्ये वितळून घ्यावे. चॉकलेट वितळण्यासाठी तव्यावर पाणी टाकून त्यावर एक ताट ठेऊन चॉकलेट वितळावे.
- त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ एकत्र करावा.
- काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळात कंडेंस्ड दूध टाकून छान मिश्रण तयार करून घ्यावे.
- मिश्रणात चॉकलेट टाकून ते थंड होण्यास ठेवावे.
- त्यानंतर ते मिश्रण मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवावेत.
4) मखाना मोदक
साहित्य
मखाना - एक कप
तूप - 1 चमचा
बदाम - 5 ते 6
काजू - 6 ते 7
खवलेला नारळ - दोन चमचे
पिस्ता - दोन ते तीन
फुल क्रीम दूध - अर्धा लीटर
साखर -3/4 कप
छोटी वेलची - चार
मखाना मोदक बनविण्याची पद्धत
मखाना मोदक बनवण्याकरता एक पॅनमध्ये मंद आचेवर मखाने हलकं भाजून घ्या. जेव्हा मखान्याचा रंग बदलेल तेव्हा मखाने एका वाटीत काढून घ्या
आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून यात बदाम आणि काजूचे तुकडे परतावे
त्यानंतर यामध्ये नारळाचा खीस घालावा आणि पिस्ता भाजून घ्यावे
एका भांड्यात दूध उकळावे. तोपर्यंत भाजलेले मखाने मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे
15- 20 मिनिटानंतर दूधात साखर मिसळावी आणि दूध निम्मे आटवावे
त्यानंतर मखान्याची पावडर आणि सुकामेवा दूधात घालावी
या संपूर्ण मिश्रणात वेलची पावडर मिसळून जाडसर मळून घ्यावे
आता मोदकाच्या साच्याला तूप लावून मोदक तयार करावे
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले.
5) पौष्टिक मोदक
बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही मोदकांचा विचार करत असाल तर काहीही न तळता आणि उकडता तुम्ही गणपती बाप्पासाठी खास सुकामेवा आणि खजूराचे मोदक बनवू शकता. कुणाच्या घरी दर्शनाला जातानाही तुम्ही हे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मोदक घेऊन जाऊ शकता.
मोदकासाठी लागणारे साहित्य
बदाम - 7 ते 8
काजू - 5 ते 6
मनुका - 7 ते 8
अक्रोड - 3 ते 4
पिस्ते - 4 ते 5
मऊसर खजूर एक कप
पाव कप तूप
मोदकाची कृती
- बाजारातून खास मऊसर खजूर विकत घ्यावेत.
- खजूराच्या बिया काढून ते हातानेच दाबून घ्यावे.
- बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ते या सुकामेव्याचे बारीक काप करावेत.
- काप करणं शक्य नसेल तर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी.
- सुकामेव्याचे बारीक काप केल्यानंतर त्यात खजूर घालावे.
- सुकामेव्याचे बारीक काप आणि खजूरा तूप टाकून ते मिश्रण हाताने चांगलं मळून घ्या.
- तयार झालेलं सारण हातावर घेऊन त्याला मोदकासारखा आकार द्या किंवा मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवा.