shani sade sati  2022  : शनि (Shani) हा विशेष ग्रह मानला जातो. जो न्यायाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, शनिदेवाने (Shani) भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेव यांना कलियुगातील न्यायाधीश म्हणजेच दंडाधिकारी ही पदवी बहाल केली. कलियुगात मानवाच्या कर्माचे फळ फक्त शनिदेवच देतात. यामुळेच शनिदेवाला कर्माचा दाता देखील म्हटले जाते.


सध्या सती आणि शनिचा (Shani) धैय्या कोणत्या राशींवर आहे?
सध्या शनीची साडेसती तीन राशींवर आणि शनीची धैया दोन राशींवर चालू आहे.  


कोणत्या राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे?
धनु, मकर आणि कुंभ राशींवर सध्या शनीची साडेसाती चालू आहे. 


शनीची धैय्या कोणत्या राशीवर आहे? 


मिथुन आणि तूळ राशींवर सद्या शनीची धैया सुरू आहे.  


साडेसाती कधी संपणार?
मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर 17 जानेवारी 2023 पर्यंत साडेसाती सुरू राहील. या दोन्ही राशींना 2023 मध्येच शनिध्यापासून पूर्ण मुक्ती मिळेल. दुसरीकडे मकर राशीतून शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि मीन राशीच्या लोकांना साडेसती सुरू होईल. पंचांग गणनेनुसार 17 जानेवारी 2023 पर्यंत शनि मकर राशीत राहील. यानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील.


उपाय
शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण नियमांचे पालन करा, गरीबांना मदत करा,  असहाय्य अशा लोकांसाठी कल्याणकारी कार्य करा तर शनिदेव लवकरच तुमच्यावर कृपा करू शकतात. शनीला लोकांना मदत करणे आवडते. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या असहाय, कष्टकरी लोकांना मदत करा. असे केल्याने शनि जीवनात शुभ फल देतो. यासोबतच शनिवारी शनि मंदिरात शनीला तेल अर्पण करा आणि शनिशी संबंधित वस्तू दान करा. असे केल्याने शनीदेव तुम्हाला प्रसन्न होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक खूप धैर्यवान असतात, पण 'या' सवयीमुळे होते फसवणूक  


Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत