Friendship Day Fashion : मित्र-मैत्रीण म्हणजे जीवाभावाचे.. सखा...सोबती..हे एक असं नातं आहे, ज्याच्याकडे आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलू शकतो. शेअर करू शकतो. अनेकवेळा असे घडते की आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना अनेक गोष्टी सांगू शकत नाही, परंतु त्याच गोष्टी आपण आपल्या मित्रांना अगदी सहजतेने सांगतो. कारण आपला मित्र आपल्या भावना समजून घेईल, यावर आपला विश्वास असतो. खरा मित्र तुमच्या सुखापासून दु:खापर्यंत नेहमी तुमच्या पाठीशी उभा असतो. आज फ्रेंडशिप डे निमित्त जर तुम्ही पार्टीचा प्लॅन केला असेल तर आजच्या पार्टीत आपल्या मित्र-मैत्रीणीसोबत 'असे' मॅचिंग आउटफिट घाला की सर्वच बोलतील.. Wow....



फ्रेंडशिप डे चा खास दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करा


बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मैत्रीवर अनेक चित्रपट बनले आहेत. मैत्रीचे नाते किती खास असते, हे या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले आहे. मैत्रीच्या या पवित्र नात्याचा उत्सव करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. या प्रसंगी अनेकजण आपल्या मित्रांसोबत वेळ घालवतात, भेटवस्तू देतात आणि सोशल मीडियावर शुभेच्छा पाठवतात. जर तुम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुमच्या मित्रासोबत कुठेतरी जात असाल तर त्यांच्याशी सुसंगत पोशाख घाला. असे करून तुम्ही हा खास दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही मॅचिंग आउटफिट्स दाखवणार आहोत.



डेनिम शॉर्ट्स


तुमचा लुक मस्त बनवण्यासाठी डेनिम शॉर्ट्स आणि टी-शर्ट सोबत घ्या. हे कॉम्बिनेशन देखील स्टाइलिश दिसते. या लूकसह, केसांमध्ये गोंडस क्लिप लावा, जेणेकरून तुमचा लूक सुंदर दिसेल.


 


 




ट्रॅक पँट आणि क्रॉप टॉप


जर तुम्ही कम्फर्टेबल लुक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशी ट्रॅक पॅन्ट आणि क्रॉप टॉप कॅरी करू शकता. ते परिधान करून तुम्ही तुमच्या मित्रासोबत कुठेही जाऊ शकता, कारण ते खूप आरामदायक आहे.




बॉडीकॉन ड्रेस


जर तुम्हाला ग्लॅमरस दिसायचे असेल तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस घाला. हे परिधान करूनही तुम्ही खूप सुंदर दिसाल. सोबत पिशवी आणि चष्मा घेऊन जायला विसरू नका. या लूकने मोकळे केस चांगले दिसतील.





ऑफ शोल्डर ड्रेस


जर तुम्हाला प्रिन्सेस लूक हवा असेल तर तुमच्या मित्रासोबत असा पांढरा शॉर्ट ड्रेस घाला. असा ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस तुमचे सौंदर्य वाढवेल. अशा ड्रेससोबत केसांना हेअर क्लिप किंवा हेअर बँड नक्कीच लावा. हे तुम्हाला गोंडस दिसेल.




हेही वाचा>>>


 


Friendship Day : खरी मैत्री कशी ओळखाल? तुमचे मित्र तुमचा गैरफायदा तर घेत नाही ना? हे संकेत जाणून घ्या..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )