Ashadh Month Remedies : हिंदू कॅलेंडरनुसार, पाचव्या महिन्याला श्रावण महिना म्हणतात. 4 ऑगस्टला आषाढ अमावस्येनंतर 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या महिन्याला इच्छापूर्तीचा महिना म्हणतात. या महिन्यात माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात.
श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेचं महत्व
श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर-कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.
श्रावण महिन्याचं महत्त्व
भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: