Friendship Day Gift Ideas : ऑगस्ट महिना जसा जवळ येतो तसे वेध लागतात ते फ्रेंडशिप डे चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुमच्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करायचा असेल तर या काही गिफ्टच्या आयडिया आम्ही तुम्हाला देत आहोत. फ्रेंडशिप डेच्या दिवशी तु्मच्या मित्र-मैत्रिणींना या काही भेटवस्तू देऊन तुम्ही मैत्रीचे बंध आणखी घट्ट करू शकता.


Coffee Mug


तुमच्या मैत्रिणीला जर काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडत असतील आणि तिला कॉफीची आवड असेल तर तुम्ही काॅफी मग खरेदी करायला हवे.  दिसायला अप्रतिम आणि क्यूट असणारे हे मग तुम्ही तिला देऊ शकता. 


Tote Bag


आजकाल टोट बॅगची फॅशन अर्थात नवा ट्रेंड चालू आहे. प्रत्येकाला अशी विशिष्ट मेसेज लिहिलेली बॅग आपल्याकडे असावी असं वाटत असतं. तुमच्या जवळच्या मैत्रिणीला जर अशी बॅग हवी असेल तर तुम्हाला  टोट बॅगेचा पर्याय चांगला आहे. तुम्हाला हव्या त्या रंगात आणि अगदी कॉलेजला जाण्यासाठी अशी फॅशनेबल टोट बॅग सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे.


Phone Cover


फोन कव्हर अनेक मुलींना आवडतात. अशा वेळी विविध कार्टुन्सचे फोन कव्हर भेट देणे उत्तम ठरू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला हे गिफ्ट देऊ शकता.


Trendy Earrings


कानातले हा असा प्रकार आहे जो प्रत्येक मुलीला आणि महिलेला आवडत असतो. फ्रेंडशिप डे च्या दिवशी आपल्या जीवलग मैत्रिणीला आवडतील असे ट्रेंडी कानातले तुम्ही गिफ्ट करू शकता.


Eye Makeup Kit


बऱ्याच जणींना मेकअपची खूप आवड असते आणि तुमची जवळची मैत्रीणही त्यापैकीच एक असेल तर तिला तुम्ही आय मेकअप किट गिफ्ट म्हणून या फ्रेंडशिप डे ला देऊ शकता. तिला नेहमी बाहेर जाताना परफेक्ट लुकमध्येच जायंच असेल आणि मेकअपची आवड असेल तर तिला हे मेकअप किट नक्कीच उपयोगी ठरेल. 


Perfume


आपल्यापैकी बऱ्याच जणांना परफ्युम वापरणं खूपच आवडत असतं. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला परफ्युम गिफ्ट देऊ शकता. तिच्या आवडीचा विचार करून मग तुम्ही परफ्युम निवडा. 


Notebook


काही जणांना खूप काही गोष्टी नोटबुकमध्ये लिहून ठेवायची सवय असते. तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला स्पेशल नोटबुक गिफ्ट करू शकता.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Friendship Day : तेरे जैसा यार कहाँ! ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो 'फ्रेंडशिप डे'?