Pune- Mumbai Express Highway : पुणे-मुंबई प्रवास आता आणखी सोपा (Pune- Mumbai Express Highway) होणार आहे.  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात आता काही प्रमाणात थांबण्याची शक्यता आहे. या मार्गावर आता पुन्हा दोन लेन वाढवण्यात येणार आहे.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) द्रुतगती मार्गावरच्या दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावदेखील तयार केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 


या मार्गाला   मंजुरी मिळताच अतिरिक्त दोन लेन बांधण्यास सुरवात होणार आहे. यासाठी सुमारे 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. दोन नवीन लेन तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, शिवाय प्रवासदेखील वेगवान होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे 60 ते 70 हजार वाहनांची वाहतूक होते, असंही सांगण्यात आलं आहे.


10 नवीन बोगदे असणार...


द्रुतगती मार्गावर लेन वाढवताना अतिरिक्त जागेची आवश्यकता असणार आहे. ‘MSRDC’च्या ताब्यात काही जागा आहेत, तर आणखी काही गावांतील जागांचे संपादन करावं लागणार आहे. शिवाय या मार्गावर 10 नवीन बोगदेदेखील बांधावे लागणार आहेत. सध्याच्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नाही. मात्र अपघात प्रवण क्षेत्राच्या जागी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. 11 उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


दिशादर्शक लावण्याच्या सूचना


या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते त्यात ही वाहनं मोठ्या प्रमाणात लेन कटिंग करत असतात परिणामी इतर गाड्यांना वाहनांच्या लेन कटींगमुळे अंदाज घेणं शक्य होत नाही. त्यामुळे यानंतर लेन कटfग करणाऱ्या अवजड वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिशादर्शक फलक नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना रस्ता समजण्यास समस्या निर्माण होत होती. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे सुरुवातीला दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांत या मार्गावर फलक लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी कठडे नाही आहेत. त्यामुळे अपघात होतात. रात्रीच्यावेळी ज्या ठिकाणी कठडे आहेत. त्याठिकाणी लाईट किंवा दिशादर्शन नाहीत. टनलमधील लाईट काही प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे ते लाईट्स दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत


हेही वाचा-


Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? 'या' कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा