Free Aashram : बाहेर फिरायला जाणे कोणाला आवडत नाही. बरीच लोक फिरायला जातात आणि आपले फोटो शेअर करतात. आजकाल तर सोशल मिडीयावर प्रत्येक जण विविध आकर्षक ठिकाणचे फोटो टाकतात. हे फोटो पाहूनच अनेकांना फिरायला जाण्याचा मोह आवरत नाही. मग लगेच वेगवेगळे ठिकाण शोधून अनेक जण बाहेर पडतात. तसेच फिरण्याची आवड निर्माण करण्यासाठी बाॅलीवूडचे (Bollywood)  काही चित्रपट देखील कारणीभूत आहेत. ते चित्रपट पाहून लोक काय काय ठरवत नाहीत. आपण इथे जाऊ किंवा आपण या ठिकाणी जाऊ किती काही स्वप्न पाहतात. असाच एक चित्रपट "ये जवानी है दीवानी" (Yeh Jawaani Hai Deewani) या चित्रपटाने लोकांना फिरण्याचे एवढे वेड लावले आहे की, लोक प्रत्येक सुट्टीला कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी पैशाची गरज असते. कित्येकदा पैसे कमी पडतात आणि बाहेर जाण्याचा प्लॅन सगळा रद्द करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का अतिशय कमी खर्चातही तुम्ही आता काही ठिकाणी फिरायला जाऊ शकता. 


भारत हेरिटेज सर्विसेस (Bharat Heritage Services ) 


 भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार म्हणूनही आहे. यामुळे ज्या लोकांना फिरायला आवडते त्यांचे ऋषिकेशला जाण्याचे स्वप्न असते. तुम्हीही ऋषिकेशला फिरायला जाणार असाल तर भारत हेरिटेज सर्विसेज याठिकाणी नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मोफत जेवण आणि मोफत राहण्याची सोय मिळेल. मात्र याकरीता तुम्हाला तिथे वॉलिंटिअर म्हणून काम करावे लागेल. सोबतच परमार्थ निकेतन हा देखील आश्रम ऋषिकेशमध्ये आहे. याठिकाणी समाज सेवा आणि आश्रमाची साफ- सफाई करून तुम्ही येथे अनेक दिवस मोफत राहू शकता. 


 


श्री रामनाश्रम, तिरुवन्नामलई ( Shree Ramneshram , Tiruvannamalai ) 


दक्षिण भारतात वसलेले तमिळनाडू (Tamilnadu) एक सुंदर राज्य आहे. या शहराला भेट देण्यासाठी अनेक लोक दरवर्षी याठिकाणी येतात. तुम्हीही तमिळनाडूमध्ये फिरायला जाणार असाल तर श्री रामनाश्रम या आश्रमामध्ये  राहू शकता. याठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला बुकिंग (Booking) करावे लागेल. बुकिंग करण्यासाठी stay@gururamana.org या वेबसाईटला भेट द्या.


गुरुद्वारा मणिकरण साहिब ( Gurudwara Manikaran Sahib )


हिमाचल प्रदेशात असणारे गुरूद्वारा मणिकरण साहिब मोफत जेवण देते. तसेच तेथे राहण्याचीही उत्तमरित्या सोय करण्यात येते. यासाठी तुम्हाला येथे आलेल्या भक्तांची सेवा करणे गरजेचे आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Pizza: 'ही' कंपनी देत आहे पिझ्झा आणि चीज खाण्यासाठी भरघोस पैसे; अनेकांना देत आहे नोकऱ्या