Foods For Oral Health : आपलं हास्य केवळ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर आपला आत्मविश्वास देखील वाढविण्यास मदत करते. निरोगी राहण्यासाठी फक्त शारीरिक आणि मानसिकच नाही तर तोंडाचं आरोग्य देखील तितकंच निरोगी ठेवणं गरजेचं आहे.  आपले मौखिक आरोग्य आपल्याला निरोगी बनविण्यात खूप मदत करते. मात्र, जीवनशैलीत झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. कमकुवत दात आणि हिरड्या या समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे आजकाल बरेच लोक त्रस्त आहेत.


दातांशी संबंधित समस्या आणि हिरड्या केवळ आपला आत्मविश्वासच कमी करत नाहीत तर यामुळे आपल्याला मोकळेपणाने हसता देखील येत नाही. अशा परिस्थितीत, दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी आपल्या आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. तुम्हालाही तुमचे दात आणि हिरड्या मजबूत करायचे असतील तर या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.


काजू


हिवाळ्यात काजू खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. एवढेच नाही तर ते तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. काजू खाल्ल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते, ज्यामुळे दात स्वच्छ राहण्यास मदत होते.


दूध


कॅल्शियमयुक्त दूध केवळ आपल्या हाडांसाठीच नाही तर दात आणि हिरड्यांसाठीही फायदेशीर आहे. नियमित दूध पिणे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.


पनीर


पनीर कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.


मासे


माशांमध्ये असलेल्या ओमेगा-3 तेलामुळे पिरियडॉन्टायटीस किंवा हिरड्यांच्या आजाराचा धोका कमी होतो.


सफरचंद


सफरचंद हे फळ अनेक गुणधर्मांनी समृद्ध असल्याने डॉक्टर देखील दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सफरचंदामुळे हिरड्या मजबूत होतात.


ब्रोकोली


आजकाल ब्रोकोलीच्या फायद्यांमुळे बरेच लोक आपल्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. यामुळे आरोग्याला तर फायदा मिळतोच पण दातही स्वच्छ होतात.    


पालेभाज्या


हिवाळ्यात भरपूर हिरव्या पालेभाज्या मिळतात, ज्या अनेक समस्यांपासून वाचवतात. या फायबर-समृद्ध भाज्या तुमच्या तोंडाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि नैसर्गिक टूथब्रशप्रमाणे काम करण्यास मदत करतात.


मनुके


अँटीऑक्सिडंटने समृद्ध, मनुके हिरड्यांशी संबंधित आजार टाळण्यासाठी आणि निरोगी दातांसाठी फार उपयुक्त ठरतात. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या