Food : देशासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान आधीच 40 अंशांच्या पुढे गेलेले दिसत आहे. या सततच्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भरदिवसा कुठे सुर्य आग ओकतोय, यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत आहे. यामुळे कधी एकदा पाऊस पडतोय, कारण ही गरमी अगदी नकोशी झालीय. असं नागरिक म्हणतायत. उन्हाळ्यात बहुतांश लोक घराबाहेर पडणे टाळत असले तरी अनेकांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेमुळे पोट दुखणे खूप सामान्य आहे. जर तुम्हालाही उष्णतेने त्रास होत असेल किंवा तुमच्या पोटाचा त्रास सुरू झाला असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास रेसिपीबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या सेवनाने तुमची पोट दुखण्याची समस्या कमी होईल. जाणून घ्या


 


खिचडी बनवण्यासाठी साहित्य


जर तुम्हालाही उष्णतेने त्रास होत असेल आणि तुमच्या पोटाचा त्रास सुरू झाला असेल तर एक-दोन दिवस जड अन्न खाण्याऐवजी खिचडी तयार करून खा. अनेकांना खिचडी कशी बनवायची हे माहित नसते, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या लेखात खिचडी कशी बनवायची ते शिकवणार आहोत. जी तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता. त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि मूग डाळ (एकत्र), 5 वाट्या पाणी, 1 चमचा हळद, आवश्यकतेनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा हिंग, 3 टेबलस्पून तूप.





खिचडी रेसिपी


खिचडी बनवणे अगदी सोपे आहे. हे करण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ आणि तांदूळ एकत्र धुवून भिजवा. सुमारे 40 मिनिटे भिजत ठेवा.


ते व्यवस्थित भिजल्यावर कुकरमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, हळद आणि हिंग टाका. 


मसाले भाजल्यावर त्यात भिजवलेली डाळ आणि तांदूळ घाला. यानंतर योग्य मापात पाणी घालून शेवटी मीठ घालावे.


मीठ व्यवस्थित मिसळल्यानंतर कुकरचे झाकण बंद करून 5-6 शिट्ट्या वाजू द्या. 


6 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा आणि कुकर बाजूला ठेवा आणि नंतर वाफ येऊ द्या. 


वाफ निघून गेल्यावर कुकरचे झाकण उघडून त्यावर कोथिंबीर घालून सजवा. 


खिचडी सोबत तुम्ही रायता सर्व्ह करू शकता. 


पोटदुखीच्या बाबतीतही रायता शरीरासाठी फायदेशीर आहे.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Food : उन्हाळ्यात हे 3 पदार्थ पचायला उत्तम! हलकं काही खायचं असेल तर रेसिपी जाणून घ्या