Food : उन्हाळा म्हटला तर तहानेने जीव नुसता व्याकूळ होतो.. सारखं थंड पाणी किंवा कोल्ड्रींक प्यावेसे वाटते. पण कोल्ड्रिंक्सचे अति सेवन केले तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उन्हाळ्यातील खास असे काही थंड पेयं सांगणार आहोत. ज्याच्या सेवनाने उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम होतील. जाणून घ्या..


 


ताक चवीलाही अप्रतिम.. शरीराला उष्णतेपासून आरामही देते. 


उन्हाळा आला की आपल्या शरीराच्या हायड्रेशनशी संबंधित गरजा वाढतात. अशात आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारची थंड पेयांचं सेवन करतो. मात्र जर तुम्ही कोल्ड्रिंक्स इत्यादींचे सेवन केले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या आहारात जर तुम्ही ताक किंवा त्यापासून बनणाऱ्या पेयांचा समावेश केला तर त्याचे फायदे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.. ताक केवळ चवीलाच अप्रतिम नाही तर ते तुमच्या शरीराला उष्णतेपासून आरामही देते. ताक हे पचन आणि आतड्याच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जाते. इतकंच नाही तर तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. हे प्यायल्याने तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटते. ताक नुसतं प्यायलं जात असलं तरी उन्हाळ्याच्या आहारात वैविध्य आणायचं असेल तर ताकाच्या मदतीने अनेक प्रकारची पेयं बनवता येतात. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला ताकाच्या मदतीने बनवलेल्या काही उत्तम पेयांबद्दल सांगत आहोत.


 




लेमोनेड


आपल्या सर्वांना उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायला आवडते. त्यात ताक मिसळून तुम्ही याला ट्विस्ट देऊ शकता. ताक लिंबूपाणी बनवण्यासाठी ताक, लिंबाचा रस, साखर किंवा मध आणि थंड पाणी एकत्र मिसळा. साखर विरघळेपर्यंत नीट मिसळा आणि बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा.



बटरमिल्क कूलर


उन्हाळ्यात आपल्या सर्वांनाच अशा पदार्थांचे सेवन करायचे असते ज्यामुळे आपल्याला आतून थंडावा जाणवतो. अशा परिस्थितीत, ताक आणि काकडीच्या मदतीने तुम्ही एक उत्कृष्ट पेय तयार करू शकता. हे करण्यासाठी काकडी सोलून कापून घ्या, त्यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, मीठ आणि ताक घालून चांगले मिसळा. ते ग्लासमध्ये ओता. तसेच बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.




मँगो बटरमिल्क शेक


उन्हाळ्यात आपण सर्वजण मँगोशेक नक्कीच पितो. साधारणपणे ते बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. मात्र, तुमची इच्छा असल्यास ताकाच्या सहाय्यानेही मँगोशेक तयार करता येईल. पिकलेल्या आंब्याच्या तुकड्यांमध्ये मध किंवा साखर आणि ताक घालून चांगले मिसळा. तयार मँगो बटरमिल्क शेकमध्ये काही बर्फाचे तुकडे घाला आणि थंडगार सर्व्ह करा.




स्ट्रॉबेरी बटरमिल्क स्मूदी


बहुतेक लोकांना स्ट्रॉबेरी स्मूदी प्यायला आवडते. मात्र, उन्हाळ्यात याला ट्विस्ट देण्यासाठी दुधाऐवजी ताक वापरून पहा. स्ट्रॉबेरी बटरमिल्क स्मूदी बनवण्यासाठी, ब्लेंडरमध्ये ताक, ताजी स्ट्रॉबेरी, एक केळी, मध किंवा गोड पदार्थ आणि काही बर्फाचे तुकडे घालून चांगले मिसळा. ही एक अतिशय रिफ्रेशिंग स्मूदी आहे, जी प्यायल्यानंतर तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : काय सांगता! 'ही' भाजी मटण-मच्छी पेक्षाही भारी? आरोग्यासाठी फायदेशीर, चवीची गोष्टच न्यारी! जाणून थक्क व्हाल..