Food : उन्हाळा म्हटलं की अपचनाच्या समस्या आल्याच.. अशात जर प्रवास करायचा असेल तर ते बाहेरचे तेलकट, चिप्स, वडापाव वैगेरे अनेकजण खातात. पण तुम्हाला माहित आहे का? प्रवासात असे पदार्थ खाल्याने पोटात अपचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी मग उन्हाळ्यात प्रवास करताना नेमके कोणते खाद्यपदार्थ पॅक करायचे? हे एक वेगळेच टेन्शन असते, कारण या ऋतूत अन्न फार लवकर खराब होते आणि जर तुमच्यासोबत मुलं असतील तर मग मोठा प्रश्न पडतो. यावेळी अशा वस्तू आपल्याजवळ ठेवाव्यात, ज्या तुम्ही सहज खाऊ शकता आणि ज्यामुळे तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या येणार नाही, कारण हे अन्नपदार्थ उन्हाळ्यात प्रवासासाठी सर्वोत्तम आहेत.


उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते


उन्हाळ्यात प्रवासा दरम्यान खाण्यासाठी आपण अनेक गोष्टी पॅक करून ठेवतो, पण हे अन्न फार लवकर खराब होते. सोबत मुलं असतील तर नेमकं काय घ्यायचं जे खाण्याचा मुलं बहाणा करणार नाहीत, याचं जास्त टेन्शन असते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला प्रवासासाठी असे काही पर्याय सांगणार आहोत, जे आरोग्यदायी आहेत आणि बरेच दिवस खराबही होत नाहीत. 



बटाट्याच्या चिप्सऐवजी केळी चिप्स


प्रवासात बटाट्याच्या चिप्सऐवजी केळीच्या चिप्स सोबत ठेवा. ज्याने पोट तर भरतेच पण ते आरोग्यदायी देखील असते. कमी मसाले आणि तेल घालून बनवलेले हे चिप्स मुलांनाही आवडतात. बटाट्याच्या चिप्समुळे गॅस आणि ॲसिडिटी होऊ शकते, मात्र केळीच्या चिप्स खाल्ल्याने या सर्व समस्या होण्याची शक्यता नगण्य आहे. प्रवासात हे खाल्ल्याने पोट खराब होत नाही आणि एनर्जीही टिकून राहते.



भाजलेला मखाना


लहान भूक भागवण्यासाठी मखाना हे सर्वोत्तम स्नॅक्स आहेत. जे मुलांनाही आवडेल. ते कुरकुरीत होईपर्यंत तुपात तळून घ्या. वर काळे मीठ, तिखट, आमचूर आणि जिरे पावडर टाकून प्रवासासाठी हेल्दी स्नॅक्स तयार करा. 


 


सुका मेवा


प्रवास करताना बहुतेक लोक सोबत चिप्स ठेवतात. कारण ही मुलं सहज खातात, पण आरोग्याचा विचार करता हा अजिबात चांगला पर्याय नाही. कॅलरी लोडेड चिप्स वजनासोबत कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्याऐवजी, आपल्या पिशवीत मिश्रित काजू ठेवा. सुक्या मेव्यामध्ये तुम्ही काजू, मनुका, बदाम, खजूर, अंजीर, भाजलेले चणे आणि शेंगदाणे देखील पॅक करू शकता. जे पोट भरल्यावर कोणत्याही प्रकारे नुकसान करत नाही.


 


हेही वाचा>>>


Health : 'गरम-गरम वरण-भात.. त्यावर तुपाची धार..' सर्वगुण संपन्न पदार्थाचे आरोग्यासाठी फायदे जाणून व्हाल थक्क


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )