Health Tips : खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि अस्वास्थ्य जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. मधुमेह (Diabetes) हा देखील असाच एक आजार आहे, ज्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. म्हणूनच मधुमेह या आजाराला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. मधुमेहामुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय आणि पाय या अवयवांसंबंधी समस्या सुरू होतात. आजकाल तरुणांनाही मधुमेहाची लागण होत आहे. अशात मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही भाज्यांचा नियमित समावेश करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया ‘या’ भाज्यांबाद्द्ल...
भेंडी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी हा भाजी सर्वात चांगला पर्याय आहे. भेंडीमध्ये स्टार्च अजिबात नसते, तर विद्राव्य फायबर मुबलक प्रमाणात आढळते. भेंडी सहज पचतात. तसेच, रक्तातील साखर देखील नियंत्रित ठेवतात. भेंडीमध्ये असलेले पोषक तत्व इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
गाजर
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मधुमेहाच्या रुग्णाच्या आहारात गाजराचा समावेश करणे आवश्यक आहे. अशा लोकांनी कोशिंबीर म्हणून कच्चे गाजर खावे. गाजरात मुबलक प्रमाणात फायबर आढळते. त्यामुळे शरीरातील साखर हळूहळू बाहेर पडते.
हिरव्या भाज्या
जर, तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश जरूर करा. पालक, दुधी, पालेभाज्या आणि ब्रोकोली यांचा आहारात समावेश करावा. या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. या भाज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते तर, कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्रोकोली खूप फायदेशीर आहे. ब्रोकोली वजन कमी करण्यास देखील मदत करते.
कोबी
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कोबी खूप फायदेशीर आहे. कोबीमध्ये स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते. कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये फायबर देखील भरपूर असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोबी खूप फायदेशीर आहे. कोशिंबीर किंवा भाजी म्हणून तुम्ही कोबी आहारात सामील करू शकता.
काकडी
काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामध्ये भरपूर फायबर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. काकडीत स्टार्च अजिबात नसतो. वजन कमी करण्यासाठीही काकडी खूप गुणकारी आहे. पोट निरोगी ठेवण्यासही काकडी फायदेशीर ठरते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha