Health Tips : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात डोळे निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात  उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणे, खाज सुटणे, पाणी येणे, डोळे लाल होणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्यात. 


1. उन्हात बाहेर जात असताना सनग्लासेस घाला. सनग्लासेस धोकादायक अल्ट्रा व्हायलेट 'ए' आणि अल्ट्रा व्हायलेट 'बी' किरणांना रोखतात.
2. सावलीत उभे असाल तरीही सनग्लासेस वापरा. जर तुम्ही सावलीत उभे असाल तर तुम्ही सुरक्षित आहात असा अजिबात विचार करू नका. सावलीमध्ये देखील तुमच्या डोळ्यांना धुळीमुळे किंवा उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो.
3. जर तुम्ही पॉवर लेन्स वापरत असाल तर नक्कीच सनग्लासेस घाला ज्यामुळे UV किरणांचा डोळ्यांना त्रास होणार नाही. 
4. घराच्या बाहेर जाताना मोठ्या आकाराची टोपी घाला. यामुळे सूर्याची किरणे तुमच्या डोळ्यांवर पडणार नाहीत.
5. उन्हाळ्यात दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवा.
6. दररोज किमान दोन लिटर पाणी प्यावे ज्यामुळे डोळे आणि त्वचेचा डिहायड्रेट होत नाही.
7. पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधील ल्युब्रिकेशन कमी होते, ज्यामुळे जीरोफ्थलमियासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
8. उन्हाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि मिनरल्सने युक्त आहार घ्या. 
9. प्रत्येक अर्ध्या तासाने डोळ्यांना 5-10 मिनिटे विश्रांती देण्यास विसरू नका.
10.  डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवा किंवा गुलाब पाण्यामध्ये भिजवलेला कापूस डोळ्यांवर ठेवा. 
11. तुमच्या डोळ्यांच्या मेकअपच्या वस्तू कोणाशीही शेअर करू नका.
12. महिन्यातून एकदा डोळे तपासून घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :