Skin Care Tips for Winter : हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील.  हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा. 


साबणाचा वापर कमी करा 
थंडीमध्ये स्किनमधील नॅचरल ऑयल (Natural Oils) कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. साबणाने त्वचेतील नॅचरल ऑइल संपते. त्यामुळे अंघोळ करताना साबणाचा वापर कमी करावा. तसेच थंडीमध्ये अंघोळकेल्यानंतर  लोशन किंवा बॉडी ऑयलचा वापर करा. 
 
अल्कोहोल बेस्ड टोनर वापरू नका
थंडीमध्ये अल्कोहोल बेस्ड टोनर (Alcohol Based Toner) चा वापर केल्याने स्किनवर रॅश येतात. त्याच्या ऐवजी गुलाब पाणी आणि  ग्लिसरीन युक्त टोनरचा वापर करावा. तसेच चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे. 
 
फेस मास्क वापरणे टाळा
हिवाळ्यात फेस मास्क लावल्याने  त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. त्यामुळे फेस मास्कचा वापर करणे टाळा. त्याच्या ऐवजी तुम्ही मुलतानी माती  किंवा बेसनच्या पिठाच्या पॅकचा वापर करू शकता. मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल. तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. 


टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?


Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित