Workout Motivation : आजच्या धावपळीच्या काळात स्वत:ला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी वर्कआऊट करणे किती महत्वाचे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे, तसेच आपल्या आळशीपणामुळे अनेकदा आपण व्यायाम करणे टाळतो. यासाठी सतत व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला घरगुती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यायाम कसा करता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
वर्कआउट पार्टनर बनवा :
अनेकांना एकटे व्यायाम करण्यास कंटाळा येतो. अशा वेळी वर्कआऊट करताना मोटीव्हेशन मिळणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचा वर्कआऊट पार्टनर बनवा. तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर सुद्धा वर्कआऊट करू शकता. यामुळे तुमचा वेळही निघून जाईल आणि व्यायामही होईल.
व्यायामाची वेळ निश्चित करा :
दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीची वेळ आपण निश्चित केलेली असते. त्याचबरोबर त्यामधूनच थोडा वेळ तुम्ही व्यायामासाठी काढणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जीम मध्येच जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीदेखील चांगल्या पद्धतीने व्यायाम करू शकता. व्यायामाची वेळ ठरवल्याने सुरुवातीला तुम्हाला कंटाळा येईल पण हळूहळू तो तुमच्या रूटीनचा भाग बनेल.
वर्कआउट्स वगळू नका :
बर्याच वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला व्यायामाच्या वेळी व्यायाम करता येत नाही. अशा परिस्थितीत तुमची वर्कआउट रुटीन बिघडते. त्यावेळी व्यायाम करता न आल्याने तुम्ही ते दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलता असं अजिबात न करता वर्कआऊट करा. जर एखाद्या दिवशी असे घडले की तुम्ही व्यस्त असाल आणि त्या वेळी तुम्हाला व्यायाम करता येत नसेल, तर कोणत्याही वेळी 10 मिनिटे व्यायाम करा. असे केल्याने तुम्हाला सुद्धा वर्कआऊट केल्याचं समाधान मिळेल.
दररोज वेगवेगळे व्यायाम करून पहा
अनेकदा एकच वर्कआऊट सातत्याने केल्याने त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार कराय. यामुळे तुम्हाला नवीन शिकण्याची संधीही मिळते. आणि वर्कआऊटचा कंटाळाही येत नाही. तुम्हाला जर डान्सची आवड असेल तर तुम्ही एरोबिक्स सुद्धा करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :