Pune News:  पुणे शहरात आतापर्यंत शंभराहून अधिक झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात पुण्यातील वेगवेगळ्या परिसराचा समावेश आहे. मागील काही दिवस पुण्यात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अशा झाडं पडल्याच्या घटना अधिक प्रमाणात घडल्या. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नातून कोणतीही जिवीतहानी झाली नाही, अशी माहितीअग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणतीही जीवितहानी न झाल्याने जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे.


पुण्यातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ,भवानी पेठ बीएसएनएल ऑफिस, प्रभात रोड, औंध आंबेडकर चौक, राजभवन जवळ, गुरुवार पेठ पंचहौद, कोंढवा शिवनेरी नगर, एनआयबीएम रोड, काञज कोंढवा रोड, नवी पेठ पञकार भवन, राजेन्द्र नगर, पर्वती स्टेट बँक कॉलनी, एसटी कॉलनी स्वारगेट , कोंढवा आनंदपुरा हॉस्पिटल या सगळ्या परिसरात झाडे पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या. या सगळ्या परिसरात दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे भरपावसात पुणेकरांना वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली होती.


यासोबतच पुण्यातील जीर्ण झालेले वाडे पडल्याचा घटना देखील घडल्या. पेठ परिसरात अनेक जुणे आणि जीर्ण वाडे आहेत. त्यातील अनेक वाडे धोकादायक असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. त्यातील अनेक वाडे यावर्षी पडले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेच्या नोटिसांचं पालन न केल्याने या प्रकाराच्या अपघातांना पुणेकरांना सामोरं जावं लागत आहे. पुणे शहरात दरवर्षी भींत कोसळल्याच्या आणि जुने वाडे कोसळल्याच्या घडना सातत्याने घडतात. पुणे शहरात अनेक जुने वाडे आहेत. ते वाडे कालांतराने जीर्ण झाले आहेत


जुन्या वाड्यांना शाबूत ठेवण्यासाठी डागडूजी केली जाते. त्यामुळे वाड्यांना फार वेळा धक्का बसतो. त्यामुळे वाडे पुन्हा खिळखिळे होतात. असे वाडे नागरिकांसाठी धोकादायक आहे. या वाड्यांबाबत महापालिकेअंतर्गत अनेकदा पाहणी केली जाते. त्यासाठी वेळोवेळी नागरिकांना सुचना दिल्या जातात. मात्र नागरिकांना हे वडलोपार्जित वाडे सोडायचे नसतात. वासरा हक्काने मिळालेला आहे. त्याची देखभाल करु, त्याची डागडूजी करु, असं नागरिकांकडून सांगण्यात येतं. शिवाय अनेक नागरिका आर्थिक परिस्थितीमुळे हे वाडे सोडण्याच्या तयारीत नसतात. त्यामुळे आलं त्या संकटाला तोंड देऊ, अशी तयारी अनेकदा नागरिकांची दिसते. मात्र कोसळल्यावर पालिकेचा आदेश पाळला असता तर बरं झालं असतं, असंही मत नागरिक व्यक्त करतात.