Virat Kohli Fitness: विराट कोहलीला कोणी ओळखत नसेल, असा एकही व्यक्ती या जगात नसेल. फक्त भारतातच नाही तर जगभरात तो प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली केवळ त्याच्या खेळासाठी आणि कामगिरीसाठी प्रसिद्ध नाही तर तो त्याच्या फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. Virat Kohli चे फिटनेस सीक्रेट सांगितलंय त्याचीच पत्नी अनुष्का शर्मा हिने... अलीकडेच तिने विराटच्या फिटनेसचा एक महत्त्वाचा पैलू सांगितला आहे.


अनुष्का शर्मा म्हणते, विराट सकाळी उठल्यावर 'हे' काम करतो


अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनुष्काने विराटच्या फिटनेसबाबत काही सीक्रेट्स सांगितले आहे. ती म्हणते, विराट हा शाकाहारी आहे आणि तो त्याच्या आरोग्याची खूप काळजी घेतो. उत्तम पौष्टिक आहारासोबतच तो व्यायाम आणि झोपेलाही विशेष महत्त्व देतो. अनुष्का शर्माने सांगितले की विराट कोहली वेळेवर उठतो आणि वर्षानुवर्षे असेच करतो आहे. तो रोज सकाळी लवकर उठतो आणि कार्डिओ करतो. कार्डिओ हा त्याच्या रोजच्या सवयीचा भाग आहे. कार्डिओनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र क्रिकेट खेळतात.






10 वर्षे झाली, पण 'हा' आवडता पदार्थ खाल्ला नाही


अनुष्काने सांगितले की, विराटने गेल्या 10 वर्षांपासून त्याची आवडती डिश बटर चिकनला हातही लावला नाही, ज्यावर विश्वास बसत नाही. ते त्यांच्या आहाराची खूप काळजी घेतो, विराट सोडा किंवा कोल्ड्रिंक्ससारखे कोणतेही गोड पेय पीत नाहीत किंवा कोणतेही गोड पदार्थ खात नाहीत.


फिटनेस आणि कामगिरीमध्ये झोपेचे महत्त्व


अनुष्काने सांगितले की, विराट त्याची उर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याच्या झोपण्याच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करतो. त्यांच्यासाठी झोप हे केवळ विश्रांतीचे साधन नसून मानसिक आणि शारीरिक वाढीसाठीही महत्त्वाचे आहे. विराटच्या मते, योग्य वेळी आणि पुरेशी झोप घेतल्याने शरीराचा थकवा तर दूर होतोच पण मानसिक शांतता आणि खेळासाठी चांगली तयारीही मिळते.


विराटच्या रुटीनमधून युवा खेळाडूंसाठी संदेश


विराटची दैनंदिन दिनचर्या हा संदेश देते की, फिटनेस फक्त जिम आणि डाएटपुरता मर्यादित असू शकत नाही, तर झोपेसारख्या सवयींचाही त्यात समावेश केला पाहिजे. आरोग्यासाठी आणि खेळातील कामगिरीमध्ये अन्न देखील महत्त्वाची भूमिका बजावते.


विराटच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलंय!


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने आपले 30 वे शतक पूर्ण केले आहे. विराट 36 वर्षांचा आहे आणि त्याने आपल्या जागतिक दर्जाच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.


हेही वाचा>>>


Health: बिअरमुळे कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )