Fashion : साडी व्यवस्थित आणि चापून चोपून नेसली म्हणजे महिलांना समाधान वाटते. कारण साडी नेसणे (Saree Draping) ही पण एक कलाच आहे. साडी ही अनेक स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने साडी नेसायला आवडते. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर (Social Media) अनेक ड्रेपिंग व्हिडिओ मिळतील. साडीच्या ड्रेपिंगबद्दल बोलायचे झाले तर, बऱ्याच लोकांसाठी हे अगदी सोपे आहे आणि बऱ्याच लोकांसाठी साडीचे प्लेट्स म्हणजेच साडीच्या निऱ्या बनवणे हे एक मोठे काम आहे. साडीचे प्लेट्सबाबत बोलायचे झाले तर यासाठी तुम्ही अनेक गोष्टींची मदत घेऊ शकता. साडीच्या फॅब्रिकनुसार प्लेट्स बनवण्याच्या पद्धती आहेत.


साडीच्या प्लेट्स बनवण्यासाठी तुम्ही अनेक सोप्या हॅक वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला साडीचे प्लेट्स बनवण्याच्या तसेच स्टायलिश साडी नेसण्याच्या काही सोप्या टिप्स सांगतो.


 


पायाच्या साहाय्याने साडीचे प्लेट्स कसे बनवायचे?


साडीचे प्लेट्स बनवण्यासाठी तुम्ही बोटांची मदत घेऊ शकता.
तुमच्या पायाच्या बोटांच्या मदतीने तुम्ही खालच्या बाजूने प्लेट्स धरून ठेवू शकता.
असे केल्याने तुम्ही साडीच्या प्लेट्सची बरोबरी करू शकाल.
सर्व प्रथम, आपल्या बोटांच्या मदतीने प्लेट्स बनवा.
यानंतर, पायांच्या पहिल्या 2 बोटांनी धरा.
हे केल्यानंतर, साडी आणि त्याचे प्लीट्स सेट करा.
आता सेफ्टी पिनच्या मदतीने साडीला परफेक्ट सेट करा.


 


हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने साडीचे प्लेट्स कसे बनवायचे?


या हेअर स्ट्रेटनिंग स्टाइलिंग टूलच्या मदतीने तुम्ही केवळ तुमचे केसच स्टाइल करू शकत नाही, तर त्याच्या मदतीने तुम्ही साडीचे प्लीट्स देखील बनवू शकता. हो हे खरंय.. साडीच्या प्लेट्स बनवण्यासाठी अंगठा आणि मधल्या बोटांनी प्लेट्स बनवा, तर्जनी आणि मधल्या बोटाच्या मदतीने प्लेट्स धरा. यानंतर तुम्ही हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने साडीचे प्लेट्स सेट करू शकता.


 


साडी सेट करण्यासाठी काय करावे?


साडीचे प्लेट्स बनवण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु ते योग्यरित्या सेट करण्यासाठी, तुम्ही सेफ्टी पिनची मदत घेऊ शकता.
कंबरेवरील प्लेट्स सेट करण्यासाठी, फक्त आतून सेफ्टी पिन लावा.
शोल्डर प्लेट्ससाठी, ब्लाउजच्या आतून खांद्याऐवजी मागच्या बाजूला सेफ्टी पिन जोडा.


 


पेटीकोटऐवजी बॉडी शेपरचा वापर


साडीच्या प्लेट्स नीट येण्यासाठी पेटीकोटऐवजी बॉडी शेपर वापरले तर उत्तम. बॉडी शेपरमुळे तुमच्या साडीला योग्य आकार मिळेल, त्यामुळे साडीच्या सुरुवातीला जे बेसिक टकिंग केले जाते, त्यात कमी साडी वापरली जाते आणि प्लेट्स बनवण्यासाठी जास्त साडी उरते


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Fashion : साध्या साडीला द्या 'स्लीव्हलेस ब्लाउजची' जोड! 'या' नव्या डिझाईन्स ट्राय करा, मग बघा कमाल...