Lipstick Hacks : लिपस्टीक म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय, विविध साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग किंवा साजेशी लिपस्टीक लावणं म्हणजे सौंदर्य कसं खुलून दिसतं. हो की नाही? आजकाल बदलत्या काळानुसार सौंदर्याचे ट्रेंड तसे रोज बदलत आहेत, रोज काहीना काहीतरी नवीन मेकअप प्रॉडक्ट आपल्याला दिसत आहेत. बदलत्या काळात मेकअप करण्याची पद्धतही खूप बदलले आहे, पण अजूनही काही गोष्टी तशाच वापरून केल्या जातात. याबद्दल बोलायचे तर, रोजच्या रोज जड मेक-अपपेक्षा लिपस्टिक लावणे पसंत केले जाते. यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून ओठांना योग्य आकार मिळेल आणि तुमच्या सौंदर्यात भर पडेल. (Lipstick Hack Lifestyle News)
ओठांचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला लिपस्टिक लावण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकून राहते. आम्ही तुम्हाला मेकअपशी संबंधित काही सोप्या टिप्स देखील सांगणार आहोत-
कोणत्या प्रकारची लिपस्टिक निवडली पाहिजे?
तसं तर लिपस्टिकमध्ये लिक्विड आणि क्रेयॉन या प्रकारांना सर्वाधिक पसंती दिली जाते. तुमच्या ओठांवरची लिपस्टिक जास्त काळ टिकावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही लिक्विड बेस्ड लिपस्टिक निवडू शकता. हे क्रेयॉनपेक्षा जास्त काळ ओठांवर राहते.
लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करावे?
लिपस्टिक लावण्याचे अनेक मार्ग आहेत, पण लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी सर्वप्रथम Applicator च्या मदतीने लिपस्टिक ओठांवर लावा. ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर, त्यांना एकत्र चोळू नका, किमान 30 सेकंद पूर्णपणे कोरडे होऊ द्या. असे केल्याने लिक्विड लिपस्टिक तुमच्या ओठांवर चांगली सेट होईल आणि बराच काळ टिकेल. तसेच लिपस्टिकची योग्य शेड निवडण्यासाठी, आपल्या त्वचेच्या टोनची विशेष काळजी घेणंही फार महत्वाचे आहे.
लिपस्टिकसाठी कोणता ब्रँड निवडायचा?
आजकाल तुम्हाला ब्युटी आणि मेकअपचे अनेक ब्रँड्स मार्केटमध्ये मिळतील. ब्रँड व्यतिरिक्त, तुमच्यासाठी लिपस्टिकचा टेक्सचर समजून घेणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या ब्रँडची लिपस्टिक निवडण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये कमीत कमी प्रमाणात रसायने असतील आणि ओठांना हानी पोहोचवू शकत नाहीत. यासाठी, नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या लिपस्टिक ब्रँड्स निवडा, ज्यामुळे तुमच्या ओठांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Holi 2024 Fashion : होळीच्या पार्टीत दिसायचंय 'लय भारी' !'ही' कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा, फोटो येतील मस्त, लूक दिसेल खुलून