Fashion : लग्न म्हणजे आयुष्यातील एक अनमोल क्षण असतो. ज्याप्रमाणे लग्न समारंभाच्या गोड आठवणींचा ठेवा फोटोच्या माध्यमातून ठेवला जातो. त्याचप्रमाणे सध्या लग्नापूर्वीचा... म्हणजेच प्री-वेडिंग शूट्सचा ट्रेंड दिसून येतोय. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय होत आहे. ज्यामध्ये जोडपे लग्नापूर्वीचे त्यांचे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. प्री-वेडिंग शूट देखील एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे, परंतु शूटचे नियोजन करणे पुरेसे नाही. त्यासाठी काही पूर्वतयारीही खूप महत्त्वाची आहे. लोकेशन आणि टायमिंग व्यतिरिक्त सगळ्यात जास्त तणाव निर्माण करणारी गोष्ट म्हणजे पोशाख. जे प्री-वेडिंग शूट संस्मरणीय बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्री-वेडिंग शूटसाठी आउटफिट कसे ठरवायचे ते जाणून घेऊया.


 


पारंपारिक फोटो पाहिजे तर..


तुम्हाला तुमच्या प्री-वेडिंग शूटला पारंपारिक टच द्यायचा असेल, तर तुम्ही सलवार-कुर्ती, सॅटिन साडी, लेहेंगा, बंगाली स्टाइल साडी, गुजराती, मराठी किंवा मुघल आउटफिट्स यासारखे पर्याय निवडू शकता. तुमचा पोशाख ठरवल्यानंतर तुमच्या जोडीदारासाठीही काही जुळणारे कपडे पाहा. मॅचिंग कपडे घातले तर फोटोत छान दिसाल. 


 


लोकेशननुसार पोशाख


तुमच्या आवडीनुसार आणि स्थानानुसार तुम्ही कॅज्युअल, पारंपरिक किंवा औपचारिक पोशाख निवडू शकता. तुम्हाला कूल आणि आरामदायी लूक हवा असेल तर रिप्ड डेनिमसह पांढरा टी-शर्ट किंवा टी-शर्टसह शॉर्ट्स एकत्र करा. मात्र, असे टी-शर्ट्सही बाजारात उपलब्ध आहेत, ज्यावर एकमेकांसाठी संदेश लिहिलेले असतात.


 


थीम ड्रेस


जर तुम्हाला आउटफिट निवडण्याचे टेन्शन असेल ते दूर होईल. उदाहरणार्थ, बीच थीम असल्यास, हलक्या रंगाचे कपडे निवडा. जर तुम्ही फोटोशूटसाठी बाग किंवा जंगलातील ठिकाण निवडले असेल, तर हिरवा रंग, वाघ किंवा फ्लोरल प्रिंट्स सर्वोत्तम असतील.


 


वेस्टर्न ड्रेस


फोटोशूटसाठी वेस्टर्न आउटफिट्सही छान दिसतात. तसेच तुम्ही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पोशाखांमध्ये शूट देखील करू शकता. जर तुम्ही वेस्टर्न घालणार असाल तर तुम्ही मिनी-मिडी ड्रेस, बॉडीकॉन ड्रेस, ए-लाइन ड्रेस, कॉकटेल ड्रेस, शॉर्ट ड्रेस गाऊन, डेनिम आणि शॉर्ट टॉप ट्राय करू शकता.


 


हेही वाचा>>>


Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )