Fashion : वय वर्षे 60.. नीता अंबानींची ओळख काही वेगळी सांगायला नको. वयाच्या 60 मध्ये सुद्धा इतक्या सुंदर, सुडौल बांधा आणि फिट दिसतात. नीता अंबानी त्यांच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. फंक्शन कोणतेही असो, त्या नेहमीच सुंदर दिसतात. या कारणास्तव, प्रत्येकजण त्यांचे लूक पाहिल्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा मुलगा अनंत-राधिका यांचं लग्न 12 जुलैला आहे. या निमित्त विविध प्री-वेडिंग फंक्शनची धूम सुरू आहे. जो तो या कार्यक्रमात विविध फॅशन करताना दिसत आहे. नीता यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या एका फंक्शनमध्ये हैदराबादी सलवार सूट परिधान केला होता. यामध्ये त्या खूपच सुंदर आणि वेगळ्या दिसत होत्या. त्यांनी कोणत्या प्रकारचा सूट स्टाईल केला हे देखील आपण जाणून घेऊ..
नीता अंबानींचा हैदराबादी सूट लुक
या छायाचित्रात नीता अंबानी यांनी सोनेरी रंगाचा हैदराबादी सूट घातला आहे. यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहे. हा सूट खड्याच्या फॅब्रिकपासून बनवला आहे. याला क्लासिक लूक देण्यासाठी सिल्व्हर आणि जरदोजी वर्क करण्यात आले आहे. त्यात बॉर्डरही दिल्या आहेत. यामुळे हा सूट आणखी वेगळा आणि छान दिसतो. त्यात जे वर्क करण्यात आलंय. त्यात सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मनीष मल्हौत्रा यांनी हा सूट डिझाइन केला आहे.
जर तुम्हालाही रॉयल लुक हवा असेल तर
जर तुम्हालाही रॉयल लुक तयार करायचा असेल, तर या हैदराबादी सूटला स्टाईल करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुन्हा डिझाइन करून घेऊ शकता. त्यात जरदोजीचे काम करून घेऊ शकता. असे कापड बाजारात 250 ते 300 रुपये प्रति मीटर दराने मिळेल. यानंतर तुम्ही बाजारातून 150 ते 200 रुपयांच्या दुपट्ट्यावर बॉर्डर खरेदी करू शकता. यानंतर, हैदराबादी सूटचे डिझाईन टेलरला दाखवा आणि तुमच्या आवडीच्या नेकलाइनसह तयार करा. ते तयार करण्यासाठी तुम्हाला 1,000 ते 2,000 रुपये खर्च येईल. तुमचा सूट नीता अंबानीसारखा तयार होईल.
या दागिन्यांसह सूट घाला
नीता अंबानींसारख्या मॅचिंग ज्वेलरीसोबत तुम्ही हा सूट घालू शकता. यामध्ये नीता यांनी सूटसोबत गोल आकाराचे कानातले, मांगटिका आणि हात फूल पेअर केले आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही असे दागिने घालू शकता किंवा तुम्ही या सूटसह चांदबली स्टाईल देखील करू शकता. यामुळे तुमचा लुकही चांगला होईल. या प्रकारचे दागिने बाजारात 100 ते 200 रुपयांना मिळतात. सुंदर दिसण्यासाठी, नीता अंबानींचा लूक रिक्रिएट करू शकता. यामुळे तुम्हीही सुंदर दिसाल. तसेच, तुम्हाला नवीन फॅशन ट्राय करायला मिळेल.
हेही वाचा>>>
Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )