Are Contact Lens Are Harmful For Eyes : जे लोक आपल्या लूक, पर्सनालिटी आणि दिसण्याबद्दल अप टू डेट असताना ते सहसा लेन्स घालणं पसंत करतात. अनेकजण नंबरचा चष्मा वापरण्याच्या ऐवजी लेन्स वापरतात. आजकाल कॉन्टॅक्ट लेन्स (Contact Lens) हा चर्चेचा विषय ठरतोय. अनेक जणे याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण म्हणजे, एका केस स्टडीनुसार, अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारा एक तरूण रात्री कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपला. यामुळे त्याला सकाळी फार कमी दिसू लागलं. अशा काही घटना जाणून घेतल्यानंतर, कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळे डोळ्यांशी (Eyes) संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या टाळता येईल. कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे फायदे, तोटे आणि कोणी कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत हे जाणून घ्या.
झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचे तोटे
- कॉन्टॅक्ट लेन्सने झोपल्याने डोळ्यांच्या कॉर्नियाला गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा संसर्गावर उपचार करणं देखील कठीण आहे.
- अशा संसर्गामुळे डोळ्यांना दिसणं कमी होतं.
कॉन्टॅक्ट लेन्स कोणी घालू नयेत?
- कॉन्टॅक्ट लेन्स फक्त अशा व्यक्तींनीच लावावी जे त्याची योग्य काळजी घेऊ शकतात.
- ज्या लोकांचे डोळे सतत कोरडे होतात त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत.
- जे लोक खूप वेळ स्क्रीनकडे बघून काम करतात. त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्सपेक्षा चष्म्याचा वापर करावा.
- ज्यांच्या डोळ्यांना ऍलर्जी आहे त्यांनी देखील कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
- कॉन्टॅक्ट लेन्स लावताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्याला वारंवार पाण्याने धुवू नये. लेन्स फक्त त्याच्या सोल्युशनने स्वच्छ कराव्यात.
- कॉन्टॅक्ट लेन्स कधीही 6 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. यामुळे ऍलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढू शकते.
- केवळ लेन्सच नाही तर ती ज्या केसमध्ये ठेवली आहे ती देखील स्वच्छ करावी.
- झोपताना किंवा अंघोळ करताना कॉन्टॅक्ट लेन्स घालणे टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करा.
- फक्त चांगल्या दर्जाच्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :