PSL 2023 Video :  पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 च्या हंगामात, लाहोर कलंदर संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) पेशावर झल्मी संघाविरुद्ध अतिशय भेदक गोलंदाजी केली. या सामन्यात आफ्रिदीने 4 षटकात 40 धावा देत पेशावर झल्मीच्या निम्म्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. 5 विकेट्स घेणाऱ्या शाहीनच्या गोलंदाजीवेळी एका धमाकेदार डिलेव्हरीचं (Shaheen Afridi fast bowling) दर्शनही सर्वांना पाहायला मिळालं. शाहीनने त्याच्या जबरदस्त वेगवान चेंडूने पेशावरच्या एका फलंदाजाची बॅट तोडली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याला त्रिफळाचीतही केलं.


पाहा VIDEO -






तर पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super league) स्पर्धेत लाहोर कलंदर्स आणि पेशावर झल्मी (lahore qalandars vs peshawar zalmi) या दोन्ही संघातील या सामन्यात, जेव्हा पेशावर झल्मीचा संघ (peshawar zalmi) 242 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा शाहीन आफ्रिदीच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पेशावरचा सलामीवीर मोहम्मद हॅरिसने समोरच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थेट त्याची बॅटच तुटली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीनने हॅरिसला बोल्ड करून स्टंप अक्षरश: हवेत उडवला. या सामन्यात शाहीनच्या गोलंदाजीचा कहर म्हणजे त्यानं सर्व महत्त्वाचे विकेट्स सामन्यात घेतले. त्यात संघाचा कर्णधार बाबर आझमच्या विकेटचाही समावेश होता. शाहीनच्या या जबरदस्त गोलंदाजीमुळे लाहोर कलंदरच्या (lahore qalandars) संघाने हा सामना 40 धावांनी जिंकला आणि हंगामातील तिसरा विजय देखील नोंदवला.


फखर जमान आणि असद शफीक यांची दमदार फलंदाजी


सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 241 धावा केल्या. 7 धावांवर संघाची पहिली विकेट पडली तेव्हा फखर जमान (Fakhar Zaman) आणि असद शफीक (Asad Shafaq) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. असदने या सामन्यात 41 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्याचवेळी, फखर जमानची बॅटसह वेगळी शैली पाहायला मिळाली, ज्यामध्ये त्याने अवघ्या 45 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 षटकारही ठोकले गेले. लाहोर कलंदरच्या संघाला आता 27 फेब्रुवारीला इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध आपला पुढचा सामना खेळायचा आहे.


हे देखील वाचा-