Share Market Updates :  भारतीय शेअर बाजार सलग सातव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) घसरण दिसून आली आहे. आयटी सेक्टरमध्ये (IT Sector) विक्रीचा सपाटा दिसून आला. जवळपास दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. आज शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 175 अंकांच्या घसरणीसह 59,288 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 73 अंकाच्या घसरणीसह 17,392  अंकांवर बंद झाला. 

सेक्टर इंडेक्समधील चित्र काय?

आज दिवसभरातील व्यवहारात  बँकिंग क्षेत्रातील शेअर दरात तेजी दिसून आली. त्याशिवाय इतर सेक्टरमधील शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. ऑटो, आयटी, मेटल, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, फार्मा, हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक्सचे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही घसरले. बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर,  19 कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी 50 मधील 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर 33 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex59,320.5059,441.1358,937.64-0.24%
BSE SmallCap27,250.9427,573.0127,162.03-1.21%
India VIX13.8815.1013.75-2.19%
NIFTY Midcap 10029,894.9030,081.8529,631.10-0.69%
NIFTY Smallcap 1009,118.259,216.509,053.20-1.12%
NIfty smallcap 504,127.454,184.204,101.45-1.42%
Nifty 10017,156.1517,212.9017,060.10-0.50%
Nifty 2008,988.809,021.958,936.20-0.52%
Nifty 5017,392.7017,451.6017,299.00-0.42%

गुंतवणूकदारांचे नुकसान 

आजच्या व्यवहारातही गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 258 लाख कोटी रुपयांवर आले आहे. तर शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 260 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज गुंतवणूकदारांचे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 2511 कंपन्यांचे शेअर दर घसरले. तर, 944 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.  तर, 174 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.  

आज दिवसभरातील व्यवहारात पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.02 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय ICICI बँक 1.99 टक्के, कोटक महिंद्रा 1.82 टक्के, एसबीआय 1.34 टक्के, HDFC 0.83 टक्के, NTPC 0.79 टक्के, IndusInd Bank 0.64 टक्के, HDFC बँक 0.6 टक्के, एशियन पेंट्स 0.40 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर,  टाटा स्टील 3.37 टक्क्यांनी घसरला. त्याशिवाय, इन्फोसिसच्या शेअर दरात 2.71 टक्के,  टाटा मोटर्स 2.29 टक्के, टीसीएस 2.01 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची घसरण दिसून आली.