Eating too Much Sugar Causes Problems : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोप या त्रिसूत्रींचा अवलंब करणे फार आवश्यक आहे. यातील एका बाबतीतही दुर्लक्ष तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहार घेण्याची आवश्यकता असते. डॉक्टर सर्वांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. आहाराकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. एका रिपोर्टनुसार, अधिक गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ आणि साखरेचे सेवन करणाऱ्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो, पण साखरेमुळे मधुमेहाप्रमाणे इतर गंभीर आजारांचाही धोका असतो. अधिक गोड खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या समस्यांचा धोकाही असतो. यामुळे आरोग्य तज्ज्ञ साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात.


जर तुम्हीही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या आणि वेळीच सावधगिरी बाळगत आहारातील साखरेचं प्रमाण कमी करा. साखरेमुळे तुमच्या शरीराची मोठी हानी होऊ शकते. अगदी सॉस असो किंवा पीनट बटरपर्यंत या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. हे पदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,  अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे फार महत्वाचे आहे. 


साखरेच्या अधिक सेवनामुळे कोणत्या समस्या वाढू शकतात? (What problems can be exacerbated by excess sugar intake?)


लठ्ठपणाचा धोका वाढतो (Increased risk of Obesity)


जास्त वजन किंवा लठ्ठपणा हे अनेक गंभीर आजारांचे कारण मानले जाते. जर तुम्ही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर सावध व्हा. अभ्यासानुसार संशोधकांना असे आढळून आले आहे की, साखरेचा समावेश असलेल्या गोष्टी वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. सोडा, ज्यूस आणि गोड चहा यासारख्या गोड पेयांमध्ये फ्रॅक्टोजचे प्रमाण जास्त असते, यामुळे जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही अधिक अन्न खाता. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. लठ्ठ व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.


हृदयविकाराची समस्या वाढू शकते (Heart Problems may Increase)


अधिक साखरेचे सेवन केल्याने हृदयविकारासह इतरही अनेक रोगांचा धोका वाढतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा आणि जळजळ तसेच ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर आणि रक्तदाबाची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराच्या धोका वाढतो. 


कर्करोगाचाही धोका वाढतो


संशोधनातअसे आढळून आले आहे की, साखरेचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ल्याने काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. साखरेचे पदार्थ आणि शीतपेयांमुळे लठ्ठपणा येतो, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Milk Side Effects : काय सांगता? दूध पिण्याचे फायदेच नाही तोटेही; काय आहे भानगड? वाचा सविस्तर...