Diwali 2024: आज वसुबारस.. दिव्यांचा आणि आनंदाचा सण दिवाळी आली आहे. लोक या सणासाठी आठवडाभर आधीच तयारी सुरू करतात. दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार 14 वर्षे वनवास भोगल्यानंतर, रावणाचा वध केल्यानंतर, भगवान श्री राम देवी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत अयोध्येला परतले, ज्याचा उत्सव संपूर्ण भारत साजरा केला जातो. दिवाळीच्या या आनंदोत्सवात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण आणि आपल्या आजूबाजूचे लोकही सुरक्षित राहू शकतील. सण साजरा करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.


दिवाळीत 'हे' काम करू नका


यंदाच्या दिवाळीत आपण सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच इतरांना समस्या येऊ नयेत, म्हणून काहीतरी नक्कीच केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत ज्या प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.


सिंथेटिक कपडे घालणे टाळा- दिवाळीत दिवे आणि मेणबत्त्या पेटवल्या जातात. त्यामुळे सिंथेटिक कपडे घालणे टाळा, कारण त्यांना आग लागण्याची शक्यता असते.


शक्यतो फटाके न वापरण्याचा प्रयत्न करा-  यंदाची दिवाळी पर्यावरणमुक्त साजरी करण्याचा निश्चय करा. देशातील अनेक वायूप्रदुषणामुळे लोकांचे आरोग्य बिघडले आहे. दिवाळीत फटाके वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका - कधीही विसरू नका की हा सण तुमचा आहे, रस्त्यावरच्या कुत्र्यांचा किंवा इतर प्राण्यांचा नाही. तुम्ही तुमचा सण कसाही साजरा करत असलात तरी प्राण्यांना त्रास देणे हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजाने त्यांना खूप त्रास होतो, त्यामुळे असे काही केले तर त्यांचा त्रास वाढू शकतो.


पार्टीमध्ये संगीताचा आवाज कमी ठेवा- दिवाळीच्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने असे करणे आवश्यक आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि जवळपास राहणाऱ्या लोकांना या गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही संध्याकाळी म्युझिक लाऊड ​​करू शकता पण जर खूप उशीर झाला तर आवाज कमी करा. हे एका चांगल्या नागरिकाचे कर्तव्य आहे.


जास्त खाणे टाळा - यावेळी लोकांच्या घरी विविध प्रकारचे पदार्थ शिजवले जातात आणि मिठाईचे सेवनही मोठ्या प्रमाणात केले जाते. सणासुदीच्या काळात तशी खाण्यावर बंधने नसावीत, पण आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही कोणाला मिठाई भेट देत असाल तर सैल मिठाईऐवजी पॅकबंद आणि ब्रँडेड मिठाई द्या.


दिवाळीचा सण आनंदी आणि उत्साही साजरा करा..!



  • तुमचे घर इको-फ्रेंडली पद्धतीने सजवा. ताजी फुले वापरणे चांगले.

  • भेसळयुक्त मिठाई आणि वस्तू बाहेरून विकत घेण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी आरोग्यदायी मिठाई बनवू शकता.

  • तुमच्या आजूबाजूला कोणी असेल ज्याला काही कारणास्तव सण नीट साजरा करता येत नसेल तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा.

  • भटक्या जनावरांसाठी घराबाहेर पाणी आणि दुधाचे भांडे ठेवा, जेणेकरून या दिवसात त्यांना खाण्यापिण्याची कमतरता भासू नये.

  • कमी वीज वापरणारे दिवे वापरा आणि प्रकाशासाठी दिवे आणि मेणबत्त्या वापरा. 


 


हेही वाचा>>>


Diwali 2024: दिवाळीच्या फोटोंमध्ये दिसाल स्लिम-ट्रीम! फक्त पोज देताना 'या' ट्रिक्स फॉलो करा अन् कमाल बघा, लाईक्सवर लाईक्स येतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )