Diwali 2023 : दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या आनंदात आणि उत्स्हात सुरु झाला आहे. घरोघरी आकाशकंदील लागले आहेत. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातायत. या सगळ्याबरोबरच सणासुदीच्या काळात प्रत्येक घरांत फराळ तर बनवले जातातच पण त्याचबरोबर मिठाई देखील बनवली जाते. घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी अनेकदा ही मिठाई दिली जाते. मात्र, मधुमेही (Diabetes) रुग्णांनी मिठाई खावी की नाही हा मोठा प्रश्न पडतो. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दिवाळीत मिठाईचा (Sweets) आस्वाद घेऊ शकता आणि तुमची साखरही (Sugar) नियंत्रणात राहील. या टिप्स कोणत्या याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


तुमच्या दिवसाची सुरुवात 'अशी' करा


जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात आरोग्यदायी गोष्टींनी केली तर तुम्हाला दिवसभर अनेक फायदे मिळतील. यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी पद्धतींनी करायची आहे. यासाठी सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्य, फळे आणि हिरव्याागार भाज्यांचा समावेश करा. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.


व्यायाम करा


दररोज व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीराला अनेकक फायदे मिळतात. यामुळे तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात तर राहतेच पण आरोग्यही सुधारण्यास मदत होते. म्हणून, दररोज शारीरिक हालचाली करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.


पोर्शन कंट्रोल करा 


जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर नेहमी तुमच्या खाण्याच्या पोर्शनवर कंट्रोल करा. म्हणजेच, जेव्हा एखादा चवदार पदार्थ तुमच्यासमोर येईल तेव्हा तो मर्यादित प्रमाणात खा. यामुळे तुमची साखरेची पातळी अचानक वाढणार नाही. जर तुम्ही अन्नाच्या भागाची पातळी नियंत्रित केली तर साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.


कमी कॅलरीजचे अन्नपदार्थ खा


सणासुदीच्या काळात बहुतेक घरांत पुरी, पनीर, मसाल्याचे पदार्थ इत्यादी तेलकट पदार्थ बनवले जातात. यापासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. तुम्ही तेलकट पदार्थ खाण्याऐवजी बेकिंग, ग्रिलिंग यांसारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Diwali 2023 : ऐन दिवाळीत बनावट मिठाईचा सुळसुळाट; भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची?