Diwali 2022 : ऑक्टोबर (October 2022) महिना हा विविध सणांनी भरलेला महिना आहे. नुकताच नवरात्रोत्सव (Navratri 2022) आणि दसऱ्याचा (Dusshera) सण पार पडला. आता लोकांना वेध लागले आहेत ते दिवाळीचे (Diwali 2022). दिवाळीचा सण अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच तुम्हालाही घरची साफसफाई, विविध वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचं प्लॅनिंग आणि विविध सणांची तयारी अशा बऱ्याच गोष्टी करायच्या असतील. 


दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते. आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या दरम्यान हा सण येतो. 


दिवाळीची सुरुवात कधीपासून?


दिवाळी हा सण दरवर्षी पाच दिवसांचा असतो. मात्र यावर्षी दिवाळी चार दिवस साजरी करता येणार आहे. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे मुख्य दिवस साजरे केले जातात. यामध्ये वसुबारसपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरुवात होते. मात्र, काही भागांमध्ये 24 ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून सुरु होते.  जर, वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात मानली तर अवघे 15 दिवस बाकी आहेत. तर, लक्ष्मीपूजनपासून दिवाळीची सुरुवात मानल्यास अवघे 17 म्हणजेच अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइकेच दिवस बाकी राहिले आहेत. 


दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी लक्ष्मी पूजन असते, हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी सर्व लोक नवीन कपडे घालतात. या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेला सर्वांचे आरोग्य आणि धनसंपदेसाठी प्रार्थना केली जाते.


प्राचीन काळची परंपरा 


दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर आणि चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम सीतेसह अयोध्येत परतले होते, प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंदोत्सव साजरा केला. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.


बाजारपेठा रोषणाईने सजल्या 


दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढत चालला आहे.   


यंदाच्या दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :



  • वसुबारस : अश्विन द्वादशी - 21 ऑक्टोबर 2022 

  • धनत्रयोदशी : अश्विन गुरुद्वादशी - 22 ऑक्टोबर 2022 

  • नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन : अश्विन अमावास्या प्रारंभ - 24 ऑक्टोबर 2022

  • बलिप्रतिपदा/पाडवा/ भाऊबीज : कार्तिक शुद्ध प्रतिपदा - 26 ऑक्टोबर 2022


महत्वाच्या बातम्या :