Motion Sickness Remedies : दिवाळीमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. काही लोकांना  रेल्वे, विमान, कार आणि बसमधून प्रवास करताना उल्टी किंवा चक्कर येते. त्यामुळे फिरायला जाताना लोक अनेक प्रकारची औषधे सोबत ठेवतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही.  


हवा येणाऱ्या ठिकाणी बसून प्रवास करावा-
जर तुम्हाला प्रवास करताना उल्टी येत असले. तर तुम्ही खिडकी असलेल्या सिटवर बसावे. खिडकीच्या दिशेने तोंड करून बसल्याने तुम्हाला उल्टीचा त्रास होणार नाही. 


पाणी किंवा एनर्जी ड्रिंग प्यावे- थंड पाणी किंवा एनर्जी ड्रिंक प्यावे. शरीर हायड्रेट राहिल्याने तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. प्रवासात चहा कॉफी पिणे टाळावे. त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो. पित्त झाल्याने उल्ट्या होतात. 


गाणी ऐकण्यात किंवा गप्पा मारण्यात मन रमवा- प्रवास करताना जर त्रास होत असेल तर गाणी ऐकण्यात किंवा गप्पा मारण्यात मन रमवावे. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास जाणवणार नाही. 


प्रेशर पॉइंट दाबा- जर तुम्हाला उल्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही आपल्या शरीराचे  प्रेशर पॉइंट्स आतल्या बाजूला दाबा. यासाठी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनीने तुमचे डावे मनगट आतल्या बाजूस दाबावेत.


झोप पूर्ण करा- प्रवासाला जाताना नेहमी झोप पूर्ण करूनच घरातून निघा. झोप पूर्ण न झाल्याने देखील तुम्हाला प्रवासात अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. 


Health Care Tips: Oily Skin असणाऱ्यांनी घरीच तयार करा 'हे' फेस पॅक; चेहऱ्यावर येईल ग्लो


चॉकलेट्स खा- पित्ताटचा त्रास गोड पदार्थ खाल्याने कमी होतो त्यामुळे  फिरायला जातानासोबत काही चॉकलेट्स ठेवा. 


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी