Natural Face Mask: तेलकट त्वचेचा त्रास अनेक लोकांना होत असतो. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कोणतेही ब्यूटी प्रोडक्ट खरेदी करताना काळजी घ्यावी कारण ते प्रोडक्ट तुमच्या त्वचेला जर सूट होत नसेल तर त्वचा खराब होऊ शकते. अनेक वेळा बाजारात किंवा ऑनलाइन मिळणारे ब्यूटी प्रोडक्ट्समुळे स्किनवर रॅश येऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक तुम्ही तयार करू शकता. जाणून घेऊयात फेस पॅकचे प्रकार-
फेसपॅकचे प्रकार
मुलतानी मातीचा फेसपॅक- मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.
काकडीच्या पाण्याचा फेसपॅक - काकडी खिसून घ्यावी. त्यानंतर त्या खिसलेल्या काकडीचे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. त्या पाण्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस मिक्स करा. लिंबू मिस्क केलेलं हे काकडीचं पाणी फ्रिजमध्ये ठेवा. ठंड झाल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर लावा. काकडीच्या या पाण्याचे आइस क्यूब देखील तुम्ही तायर करू शकता. हे क्यूब सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चेहऱ्यावर फिरवावेत. काकडीच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
मसूर डाळीचा पॅक- दोन चमचे मसूर डाळीचे पिठ घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दही आणि गुलाब पाणी मिसळा. या पॅकला मिक्स करा. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर असलेले डाग आणि तेलकटपणा मसूर डाळीच्या या पॅकने जातो. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावावा. काकडीचा ज्यूस देखील आरोग्यासाठी चांगला असतो. या ज्यूसने शरीरातील चर्बी कमी होते.
तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी
Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू