Soap Side Effects On Skin:  अनेक लोक चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा (Face Wash) वापरतात. काही लोक चेहरा धुताना चेहऱ्याला साबण लावतात. चेहऱ्यावर साबण (Soap) लावल्याने त्वचेच्या संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. साबण  (Soap Side Effects On Skin)  चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो निघून जातो. साबण चेहऱ्याला लावल्यानं होणाऱ्या साइड इफेक्ट्सबद्दल देखील जाणून घेऊयात...


चेहरा धुताना साबण वापरल्यानं तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. साबणातील कॅमिक्स टॉक्सिन्समुळे चेहऱ्यावरील  बॅक्टीरिया, स्किनच्या लेअरमध्ये खोलवर जाऊ देतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. चेहऱ्यावर साबणाचा सतत वापर केल्याने चेहरा लालसर होणे, कोरडेपणा जाणवणे, चेहऱ्यावर खाज येणे आणि सुरकुत्या येणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.


त्वचेचे पोर्स होतील ब्लॉक



चेहरा धुताना साबणाचा नियमित वापर  केल्यानं त्वचेचे पोर्स ब्लॉक होऊ शकतात. साबणांमध्ये फॅटी अॅसिड असतात, जे त्वचेच्या पोर्समध्ये जमा होतात. ज्यामुळे त्वचेचे पोर्स  ब्लॉक होतात. त्वचेचे पोर्स ब्लॉक झाल्यानं  ब्लॅकहेड्स, इन्फेक्शन अशा समस्या उद्भवू लागतात.


त्वचेमधील व्हिटॅमिन्स निघून जातील



त्वचेमध्ये काही नॅचरल व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्वचा हेल्थी आणि फ्रेश राहते. साबणामध्ये स्ट्राँग केमिक्स असतात. या केमिकल्समुळे त्वचेमधील व्हिटॅमिन डी निघून जाते. त्यामुळे त्वचेवरील ग्लो निघून जातो.


साबणाचा वापर केल्यानं प्रदूषणामुळे होणाऱ्या फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते आणि डेड स्किन देखील निघून जाते. परंतु साबण चेहऱ्यावर लावणे टाळावे. अंघोळ करताना तुम्ही साबण शरीरावर लावू शकता. पण चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा. 


चेहरा धुताना करा फेसवॉशचा वापर 


चेहरा धुताना तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश लावू शकता. तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही फेसवॉशचा वापर करु शकता. क्रिम फेसवॉश, फोम फेसवॉश, क्ले फेस वॉश, जेल बेस्ड फेस वॉश इत्यादी फेसवॉशचे प्रकार आहेत. फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होतो.  तुम्ही चेहऱ्याला क्लिंजिंग क्रिम, व्हिटॅमिन सी सिरम आणि हायड्रेटिंग फेसमास्क देखील लावू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Skin Care Tips : उन्हाळ्यात चेहरा सतत धुताना फॉलो करा 'या' टिप्स; त्वचेचा ग्लो राहील टिकून!