Vitamin D Food : निरोगी शरीरासाठी आणि रोगांपासून मुक्त राहण्यासाठी शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता असते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. हेच कारण आहे की डॉक्टर सर्व आवश्यक पोषक तत्त्वे घेण्याची शिफारस करतात. आज आपण अत्यावश्यक पोषक तत्व मानल्या जाणार्‍या व्हिटॅमिन डीबद्दल बोलणार आहोत. बरेच लोक व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी जास्त प्रमाणात सेवन करतात. मात्र, पोषक तत्वांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. 


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेहमी जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी न घेण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेण्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन डी चांगले आरोग्य राखण्याचे काम करते. स्नायू पेशी, रोगप्रतिकारक शक्तीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारी शारीरिक समस्या टाळण्यासाठी लोक त्याचे सप्लिमेंट घेतात. मात्र, असे काही लोक आहेत जे तज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे पूरक आहार घेतात. 


व्हिटॅमिन डी चे दुष्परिणाम


जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्यास हायपरविटामिनोसिस डी किंवा व्हिटॅमिन डी विषारीपणा होऊ शकतो आणि व्हिटॅमिन डीच्या विषारीपणामुळे हायपरक्लेसीमिया होऊ शकतो, ज्यामध्ये रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. याशिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असू शकतात. किडनीशी संबंधित समस्या असू शकतात. 


डॉक्टरांचा सल्ला घ्या


पोषक तत्वांचा अतिरेक देखील अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आवश्यक पोषक घटकांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. व्हिटॅमिन डी किंवा इतर कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी, डॉक्टर किंवा आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न किंवा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही पोषक तत्वांशी संबंधित कोणतेही सप्लिमेंट खाता तेव्हा प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय व्हिटॅमिन डी असलेल्या भाज्या आणि फळांचं सेवन करा. 


आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी कितीजरी चांगले असले तरी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य आहाराचं सेवन करा.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत 'ही' आहेत फायबरयुक्त फळं; आजच आहारात समावेश करा