Dhantrayodashi 2022 : देशभरात दिवाळीचा (diwali) सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज (23 ऑक्टोबर)  दिवाळीचा दुसरा दिवस आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी (dhanwantri) आणि माता लक्ष्मी (Laxmi) यांची विधिवत पूजा केली जाते.
समुद्रमंथनादरम्यान भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांचा जन्म झाला. यामुळे धनत्रयोदशीला या दोघांचे पूजन केलं जाते. जाणून घेऊयात धनत्रयोदशीचं महत्व काय?


यंदाची धनत्रयोदशी आज संध्याकाळी 4:33 पासून सुरू होईल. यंदा हा सण आकाशातील बाराव्या नक्षत्र उत्तरा फाल्गुनीच्या सावलीत साजरा होणार आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह सूर्य आहे, जो खूप शक्तिशाली ग्रह आहे आणि ग्रहांचा राजा देखील आहे. ज्यामुळं राजस घरामध्ये वाढ होईल आणि लोक जोरदार खरेदी करतील. 22 ऑक्टोबर रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 1.49 मिनिटांपूर्वी असेल आणि ब्रह्मयोग संध्याकाळी 5.10 मिनिटांपर्यंत राहील. यानंतर इंद्र योग सुरू होईल.


आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं


धनत्रयोदशीला धनतेरस असे सुद्धा म्हटले जाते. आपल्या प्रत्येक हिंदू सणाला काही ना काही पौराणिक कथा लाभलेल्या आहे. धनतेरस या सणाला सुद्धा अशीच एक पौराणिक कथा आहे ज्यामुळे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूर्वीच्या काळी समुद्रमंथन चालू होते. देव आणि दैत्य हे दोघे मिळून समुद्रमंथनाचा कार्यक्रम करीत होते. समुद्रमंथन करत असताना माता लक्ष्मी व भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झालेले होते. म्हणूनच धनत्रयोदशीच्या म्हणजेच धनतेरसच्या दिवशी या तिन्ही देवतांची एक साथ पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लोक जास्तीत जास्त सोने खरेदी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हे अश्विन महिन्यात तेराव्या दिवशी येत असते. धनतेरस च्या दिवशी धन्वंतरी चा जन्म झाल्याची माहिती आहे. धन्वंतरी हा देवांचा वैद्य होता. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी ची पूजा करण्यात येते. तसेच माता लक्ष्मी आणि कुबेराची सुद्धा पूजा करतात. 


धनत्रयोदशेच्या पूजेची वेळ आणि मुहूर्त  


22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:33 वाजता धनत्रयोदशी सुरु होईल. धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:04 पर्यंत असेल. राहू काल सकाळी 9 ते 10:30 पर्यंत राहील. कुंभ दुपारी 3.38 ते 5:6 पर्यंत राहील आणि 8.41 ते 10.55 पर्यंत वृषभ राशीत राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळ किंवा वृषभ राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे उत्तम मानले जाते. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्याचा दर्जा आहे. त्यामुळं उत्तम आरोग्यासाठी अमृत चोघडिया, लाभ चोघडिया, वृषभ राशीत धन्वंतरी पूजन करावे. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेसाठी 6 वाजून 7:30 आणि नंतर 9 वाजून 30 मिनिटांपर्यंतचा काळ उत्तम राहील.


सूर्यास्ताच्या वेळी अकाली मृत्यू आणि त्रासांपासून बचावासाठी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर 4 वातींचा दिवा दान करावा. मोहरीचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरी आणि समृद्धीसाठी कुबेरासह लक्ष्मी गणेशाची पूजा करून भगवती लक्ष्मीला नैवेद्यात धने, गूळ आणि भाताचा लवा अवश्य अर्पण करावा. व लक्ष्मी गणेश व कुबेर महाराज यांची पूजा करावी.