Home Remedies of Ajwain : भारतीय संस्कृतीत असे कोणतेही घर नसेल जिथे ओव्याचा वापर होत नसेल. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजे आढळतात. यामुळे पोटाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अनेकांना पचनाच्या समस्या होतात. अशा स्थितीत तुम्ही ओव्याचा वापर करू शकता. 


जर तुम्हाला सूज येणे, ओटीपोटात दुखणे आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या असतील तर ओवा ही समस्या दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला अॅसिडिटी, गॅसची समस्या आणि पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही ओवा वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. या वेगळ्या पद्धती कोणत्या हे जाणून घ्या.


अॅसिडिटीच्या समस्येवर मात : 


जर तुम्हाला नेहमी अॅसिडिटी आणि गॅसची समस्या असेल तर तुम्ही ओवा वापरू शकता. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, एक चमचा ओवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून फक्त ओवा चावा. यामुळे तुमची पोटदुखीची समस्या लवकर दूर होईल.   


पोटदुखीच्या समस्येवर मात : 


पोटदुखीचा त्रास होत असेल तर, ओव्याचे गरम पाणी प्या. हे करण्यासाठी, एका पॅनमध्ये एक चमचा ओवा पाण्यात मिसळा. याला उकळी येऊ द्या. त्यानंतर ओवा नीट गाळू घ्या. आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ टाकून ते पाणी प्या. तुमची पोटदुखीची समस्या लगेच दूर होईल.


अपचनाची समस्या दूर करण्यासाठी :


जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर ओवा खूप फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी तुम्ही संपूर्ण ओवा गरम पाण्यात चावून खा. अपचनासह पोटात जळजळ होण्याची समस्या दूर होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :