Constipation Awareness Month : प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपणाचा (Pregnancy Tips) अनुभव हा सर्वात खास आणि वेगळा असू शकतो. काही स्त्रियांसाठी हा प्रवास अगदी सहज असतो. तर, काहींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण, काही समस्या या काळात प्रत्येक स्त्रीला त्रास देतात. जसे की, मॉर्निंग सिकनेस, मूड स्विंग्स आणि बद्धकोष्ठता (Constipation). त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. बद्धकोष्ठता ही अशी समस्या आहे की त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतात. गरोदरपणात आहारात पोषणयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास ही समस्या बर्‍याच प्रमाणात टाळता येते. गरोदरपणाच्या प्रत्येक त्रैमासिकात बद्धकोष्ठतेचा सामना करण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.


1. पहिल्या तिमाहीत 'अशी' काळजी घ्या


गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉन आणि हार्मोनल बदलांमध्ये वाढ झाल्यामुळे पचनक्रिया मंदावते, बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते. गर्भवती महिलांनी विशेषतः फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. गव्हाची भाकरी, तपकिरी तांदूळ आणि बार्ली खाणे देखील गर्भधारणेदरम्यान एक चांगला पर्याय आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या, यामुळे शरीर हायड्रेट तर राहतेच पण पचनासही मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.


2. दुसऱ्या तिमाहीसाठी महत्त्वाच्या टिप्स


गर्भधारणा जसजशी वाढत जाते, तसतसा गर्भाशय आतड्यांवर दबाव पडतो. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची पूर्ण शक्यता असते. तुमच्या आहारात पालेभाज्या, ब्रोकोली आणि गाजर यांचा समावेश करा. या अन्नपदार्थांमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. विशेषतः दही आणि ताक यांचा समावेश करा. कारण ते आतडे निरोगी ठेवणारे बॅक्टेरिया टिकवून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. 


3. तिसऱ्या तिमाहीत बद्धकोष्ठता कशी हातळाल?


1. दिवसभर पुरेसे पाणी प्या. पाणी मल मऊ करण्यास मदत करते आणि निर्जलीकरण टाळते.


2. तुमच्या जीवनशैलीत काही हलका व्यायाम करा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. 


3. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या. 


4. कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात लोहाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील वाढू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात