हिवाळ्यातील आजारांपासून स्वत:ला कसं वाचवाल?
सांधेदुखी : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास अनेकांना होतो. अशावेळी सांध्यांना तेलानं रोज मालिश करावी. तसंच गुडघे दुघत असतील तर पायांना त्रास होईल अशी कामं टाळण्याचा प्रयत्न करावा. मात्र थंडीपासून वाचण्यासाठी पुरेसा व्यायामही करावा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोकेदुखी : हिवाळ्यात अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चश्मा आणि डोकं झाकण्यासाठी टोपीचा वापर करावा.
थंडीमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते. अशावेळी त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर करावा. पाणी जास्त प्यावं. तसंच शरीराला तेल लावून मसाजही करावा.
थंडीमध्ये दमा, अस्थमा सारखे आजार बळावतात. त्यामुळे ज्यांना या आजारांचा त्रास होतो, त्यांनी आपली औषधं वेळेत घ्यावी. वेळोवेळी डॉक्टरचा सल्लाही घ्यावा.
हिवाळ्यात कमी तापमानामुळे सर्दी होते. सर्दीमुळे अनेकदा घसा सुजतो. अशावेळी डॉक्टरच्या सल्ल्यानं औषधं घ्यावीत. तसंच घसा शेकण्यासाठी कोमट पाणी प्यावं. घसा दुखत असल्यास मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या.
सर्दी : हिवाळ्यात प्रामुख्यानं होणारा आजार म्हणजे सर्दी, या सर्दीमुळे ताप आणि खोकला येण्याची शक्यता असते. सर्दी झाल्यावर शिंका येतात, त्यातून जंतूंचा प्रसार होत असतो. त्यामुळे सर्दी झाल्यास तातडीनं डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ती औषधं घेणं जरुरीचं आहे.
नैराश्य : हिवाळ्यात बऱ्याच लोकांना सेंसेशनल डिप्रेशनला सामोरं जावं लागतं. यालाच विंटर ब्लूज अस म्हणतात. विंटर ब्लूज म्हणजेच सीझनल अफेक्टीव्ह डिसऑर्डर मुळे दिवसभर आपला मूड बदलत असतो. त्यामुळे अशा वेळी एकटं राहणं टाळून बाहेर फिरणं आवश्यक आहे. तसंच पुरेशी झोप घेणंही गरजेचं आहे.
वजन वाढ : हिवाळ्यात थंडीमुळे भूक मोठ्या प्रमाणावर लागते, मात्र त्याप्रमाणात आपला व्यायाम होत नाही. यामुळे वजन वाढू लागतं. त्यामुळे रोज पुरेसा वर्कआऊट करणं गरजेचं आहे. तसंच आहारावरही नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
हार्ट अटॅक : हिवाळ्यात थंडीमुळे ब्लड प्रेशर वाढतो, त्यामुळे साहजिकच हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कारण वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण पडतो. तसंच थंडीमध्ये शरीराचं तापमान नियंत्रीत ठेवण्यासाठी शरिराला जास्त काम करावं लागतं. या कामामुळे हृदय सतत कामात राहतं. त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
उच्च रक्तदाब : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंडीमुळे रक्तदाब वाढतो. थंडीमुळे शिरा आकुंचन पावतात, त्यामुळे रक्त पुरेशा प्रमाणात प्रवाहित होत नाही. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. आपला रक्तदाब निंयत्रित ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
हिवाळा सुरु झाला की प्रवासासाठी बाहेर जाण्याचे बेत आखले जातात. मात्र हवा बदलामुळे अनेक आजारांनाही आमंत्रण दिलं जातं. त्यापैकीच काही आजार आणि त्यापासून वाचण्याचे उपाय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -