'दंगल'ची दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच
सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ल्डवाईड दुसऱ्या दिवशीचा आकडा अजून येणं बाकी आहे.
या सिनेमाने भारतातच नव्हे तर वर्ल्डवाईड देखील मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी सिनेमाने वर्ल्डवाईड 28.49 कोटी रुपयांची कमाई केली होती.
त्यामुळे कमाईचा आकडा आणखी वाढत हा सिनेमा पहिल्या तीन दिवसातच 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज लावला जातोय.
नोटाबंदीतही एवढा गल्ला जमवणं ही मोठी गोष्ट मानली जात आहे. सिनेमाला समीक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणात दाद दिली आहे. शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरला आहे.
समीक्षक तरुण आदर्श यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी सिनेमाने 29.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे पहिल्या दोन दिवसात सिनेमाने एकूण 64.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
नवी दिल्ली : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दमदार कमाई केली आहे. 'दंगल'ने शनिवारी 34.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -