Christmas Gift Ideas 2023 : ख्रिसमसला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ख्रिश्चन लोकांचा हा सण खूप प्रसिद्ध सण आहे. ख्रिसमसचा सण भारतासह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुले ख्रिसमसचीआतुरतेने वाट पाहतात. खरं तर ख्रिसमसच्या एक रात्री सांता (Santa) मुलांना भेटवस्तू देतो. तसेच ख्रिसमसला सिक्रेट सँटा (Secret Santa) हा गेम प्रसिद्ध असतो. लोक आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, मित्रांना सिक्रेट सँटा म्हणून गिफ्ट्स देतात. तुम्हीही ख्रिसमसला सिक्रेट सँटा म्हणून काही गिफ्ट्स देण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला कोणते पर्याय देऊ शकता ते सांगणार आहोत.


Christmas Gift Ideas 2023 : केक (Cake)


ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही स्वत: केक बनवू शकता किंवा केक खरेदी करून आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना सिक्रेट सँटा म्हणून भेट देऊ शकता. आपण बनवलेला किंवा खरेदी केलेला केक ख्रिसमस थीमवर बनवला पाहिजे. ख्रिसमसला केक मिळाल्याने त्यांचा दिवस खास होईल.


Christmas Gift Ideas 2023 : झाड (Plants)


ख्रिसमसला भेट देण्यासाठी झाड हा एक उत्तम पर्याय आहे. आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, मित्रांना सिक्रेट सँटा म्हणून इनडोअर किंवा आउटडोअर झाड भेट देऊ शकता. ऑनलाईनच्या जमान्यात झाड ऑनलाईन मागवून पाठवता येतात. ज्यांना गिफ्ट कराल त्यांना रोज ते झाड बघून तुमची आठवण देखील येईल. 


Christmas Gift Ideas 2023 : पुस्तक (Books)


पुस्तक ही अशी गोष्ट आहे जी आपण कोणालाही केव्हाही भेट देऊ शकता. जर ख्रिसमस असेल आणि आपल्याला सिक्रेट सँटा  म्हणून काहीतरी भेट द्यायचे असेल तर पुस्तके हा एक उत्तम पर्याय आहे. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना, प्रियजनांना, मित्रांना पुस्तके भेट देऊन त्यांचा ख्रिसमस चांगला बनवू शकता. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना ऑनलाइनद्वारे पुस्तक ऑर्डर करू शकता.


Christmas Gift Ideas 2023 : ब्यूटी प्रोडक्टस (Beauty Products)


आजच्या काळात ब्युटी प्रॉडक्ट्सना सर्वाधिक मागणी आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना सिक्रेट सँटा म्हणून काही तरी गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांना ब्युटी प्रॉडक्ट्स गिफ्ट करू शकता. तुम्ही कोणत्याही स्त्री-पुरुषाला ब्युटी प्रॉडक्ट्स गिफ्ट करू शकता.


इतर महत्वाची बातमी-


Guinness World Record Pune : गोष्टी सांगण्यात पुणेकर अव्वल, चीनचा विक्रम मोडला, SP कॉलेजच्या मैदानात 3 हजार पालकांनी एकाचवेळी छान छान गोष्टी सांगितल्या!