Merry Christmas 2021 : 25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या (Christmas) शुभेच्छा देतात. असं म्हणलं जातं की, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला. जगात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जाणून घेऊयात ख्रिसमस सणाबद्दल काही खास गोष्टी...
ख्रिसमस ट्री
रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. असं म्हणले जाते की ख्रिसमस ट्रीमुळे सर्व निगेटिव्हीटी निघून जाते. प्रभू येशूच्या आई-वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी देवदूतांनी फरचे झाड सजवले होते. त्यामुळे ख्रिसमसला फरच्या झाडाला सजवले जाते. असं म्हणतात. रिपोर्टनुसार ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमधून सुरू झाली.
सांताक्लॉज
ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. असं म्हणलं जातं की सांताक्लॉज उत्तरी ध्रुवावर राहतो आणि तो उडणाऱ्या स्लेजमधून प्रवास करतो. संत निकोलस यांनी सांताक्लॉज मानले जाते. कारण ते रात्री सर्व गरजू व्यक्तींना भेटवस्तू देत होते. तसेच गरीब आणि गरजू लोकांची ते मदत देखील करत होते.
आपली इच्छा काय आहे, ते एका कागदावर लिहून ती चिठ्ठी एका सॉक्समध्ये बरीच लोक ख्रिसमसच्या दिवशी ठेवतीत. एकदा संत निकेलस यांनी एका व्यक्तीची मदत सॉक्समध्ये सोनं देऊन केली. त्यामुळे तेव्हा पासून सॉक्समध्ये चिठ्ठी ठेवून त्यांना हवी ती गोष्टी सांताक्लॉजकडे मागतात.
'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' हा शब्द वापरला होता. 'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.
संबंधित बातम्या
Health Tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा हा 'होम मेड पॅक' पायाचे तळवे होतील मुलायम
Swiggy report : 2021 मध्ये 'या' डिशला देशाची पसंती; मुंबईकरांनी अन् पुणेकरांनी कशावर मारला सर्वाधिक ताव