मुंबई : अनेक देश ओमायक्रॉन संकटामुळे लॉकडाऊनच्या दिशेनं जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. निर्बंधाबाबतची नवी नियमावली दुपारी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनबाधितांनी उच्चांक गाठला असून आज 23 रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाली आहे. या बैठकीत टास्क फोर्समध्ये नव्या निर्बधांवर झाली. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तसेच लग्न समारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी टाळण्यावर देखील सरकारचा भर आहे. तसेच रात्री 144 कलम लागण्याची शक्यता आहे.
या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या आहेत. तसेच नरेंद्र मोदींनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहे.
गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश
ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी